यावर्षी हिवाळ्यात महागात पडणार गुळाचा गोडवा, किमतीत होत आहे वाढ, चेक करा लेटेस्ट भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिवाळ्यात गुळाची चर्चा तर होतेच. परंतु, यावेळी गुळाचा गोडवा काहीसा महाग होऊ शकतो. यावेळी बाजारात गुळाची आवक तर चांगली झाली आहे, परंतु मागणी जास्त असल्याने ग्राहकांना गुळाचा गोडवा चाखणे महागात पडणार आहे. मकर संक्रांतीपर्यंत याच्या मागणीत वाढ दिसू शकते. जानेवारी महिन्यात गुळाचा वायदा भाव 1150 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

1115 रुपये आहे भाव
सध्या नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेडवर जानेवारीचा वायदा भाव यावेळी 1115 सुरू आहे.

15 डिसेंबरपासून सुरू झाले ट्रेडिंग
एनसीडीईएक्सवर गुळाचे फ्युचर ट्रेडिंग 15 डिसेंबरच्या आसपास सुरू होते. 15 डिसेंबरला तो सुमारे 1062 रुपयांच्या लेव्हलवर ओपन झाला होता. एनसीडेक्सवर ट्रेड होणार्‍या गुळाची बेस व्हॅल्यू 40 किग्रॅच्या आधारावर ठरते. तर, मकर संक्रातीपर्यंत हा भाव आणखी वाढू शकतो.

मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढला भाव
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी गुळाचा भाव 250-300 रुपये जास्त आहे. म्हणजेच किरकोळ बाजारात सुद्धा गुळ महाग मिळाणार. गुळ सर्वात मोठ्या प्रमाणात पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मिळतो. कारण येथे गुर्‍हाळांची संख्या खुप जास्त आहे. बाजारांऐवजी थेट गुर्‍हाळांवरून व्यापर होतो.

भारतात होते सर्वात जास्त उत्पादन
जगभरात सर्वात जास्त गुळ उत्पादन भारतात होते. भारतात सुमारे 60 टक्के गुळाचे उत्पादन होते. मात्र, निर्यातीच्या बाबतीत ब्राझील सर्वात पुढे आहे. याशिवाय आयातीच्या बाबतीत सर्वात पुढे यूएसए, चीन आणि इंडोनेशिया आहे.