काय सांगता ! होय, 1196 भिकार्‍यांचं प्रोफाइल ‘रेडी’, काही जणांचं झालंय MA आणि M. Com पर्यंत शिक्षण

जयपूर : वृत्तसंस्था – सामाजिक सुधारणेसाठी जयपूर पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. पिंकसिटीला भिकारीमुक्त करण्यासाठी शहरातील सर्व भिकाऱ्यांची प्रोफाइल तयार केली आहे. 15 ऑगस्ट पासून या भिकाऱ्यांच्या पुनर्वसनाचं काम सुरु करण्यात आलं आहे. नोंदणी करण्यात आलेल्या 1196 भिकाऱ्यांमध्ये पाच जण ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट आहेत. या भिकाऱ्यांच्या स्किल नुसार त्यांना कामाची संधी देण्यात येईल. तसंच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिलं जाणार आहे.

कोरोना संकट काळात या भिकाऱ्यांच्या जीवनावर मोठं संकट आलं होतं. डीजीपी भूपेंद्र सिंह यादव यांनी भिकाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष दिलं. त्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचे पाऊल उचलत ही जिम्मेदार जयपूर पोलिसांवर सोपवली आहे. जयपूर पोलिसांनी शहराला भिकारीमुक्त करण्यासाठी काम सुरु केलं असून त्यांनी आत्तापर्यंत 1196 भिकाऱ्यांचं प्रोफाइल बनवलं आहे. 26 मुद्दे असलेल्या या प्रोफाइल मध्ये वय, आरोग्य, शिक्षण, लिंग, स्किल अशा मुद्द्यांचा समावेश आहे.

5 जण कोरोना पॉजिटिव्ह आढळले

प्रोफाइल तयार करताना समजलं की, या भिकाऱ्यांमध्ये पाच जण ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट आहेत. तर 193 भिकारी 12 वी पर्यंत शिकले आहेत आणि 39 जण साक्षर आहेत. 1196 भिकाऱ्यांपैकी 231 जण बांधकाम करू शकतात तर 103 मजूर करू शकतात. 27 शिकवण्याचं तर 59 जण केटरिंगचं काम करू शकतात. 7 जण हॉटेल, 2 जण झाडू, 9 जण चौकीदार तर 7 जण सफाई कामगार म्हणून काम करू शकतात. 1196 भिकाऱ्यांपैकी 117 भिकारी कोणतेही काम करण्यासाठी तयार आहेत तर 160 जण असे आहेत त्यांना कोणतंच काम करायचं नाही. 12 भिकाऱ्यांच्या पुनर्वसनाचं काम सुरु असताना त्यातील 5 जण कोरोना पॉजिटिव्ह आढळले.

सगळेजण त्यांच्या मनाने भीक मागतायत

एडिशनल पोलीस कमिशनर अजयपाल लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रॅज्युएट असणाऱ्या 5 भिकाऱ्यांपैकी कोणी बीकॉम केलं आहे तर कोणी एमकॉम केलं आहे. तसंच काही जणांनी ग्रॅज्युएशन मधूनच सोडलं आहे. सगळेजण त्यांच्या मनाने भीक मागत आहेत. शिक्षण झालेले भिकारी आहेत हे समजल्यावर त्यांना काहीतरी काम देण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन यांची मदत घेतली जाईल.

कोणत्याही भिकाऱ्यांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही

या सर्व भिकाऱ्यांपैकी सर्वात जास्त म्हणजे 800 भिकारी राजस्थानचे आहेत आणि 95 भिकारी उत्तर प्रदेशचे आहेत. जयपूर मध्ये 18 राज्यातील भिकाऱ्यांच्या समावेश आहे. यापैकी 150 भिकारी दिव्यांग आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांच्यापैकी कोणाचंही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही.