राफेल डील प्रकरणातील आरोप जेटली यांनी फेटाळले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य बनवले असून देशभर या सरकार विरोधात मोहीम उघडलेली आहे. सरकारच्या वतीने प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली वादात उतरले असून काँग्रेसने केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’614869aa-ab7c-11e8-8211-03e31373fe8b’]

सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीला टाळून व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला होता. हा आरोप खोटा असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे. महत्त्वाच्या समितीला टाळून पुढे जाण्याने सरकार चालत नाही. २०१४ मध्ये हा व्यवहार झाला होता. २००७ च्या तुलनेत स्वस्त दरात राफेल विमाने खरेदी करण्याचे ठरले. त्यासाठी सन २०१५, १६ मध्ये प्राईस निगोसिएशन समिती आणि कॉन्ट्रॅक्ट निगोसिएशन समिती यांच्यात अनेक बैठका झाल्या. २०१६ मध्ये व्यवहाराला अंतिम स्वरुप आले. सुरक्षा विषयक समितीने मंजुरी दिली. या घडामोडी काँग्रेस कशा काय नाकारू शकते असा सवाल जेटली यांनी केला. यासंदर्भात कॅगकडे पाठवलेला अहवालही पहाता येईल तरीही काँग्रेस खोटे बोलत आहे असेही जेटली म्हणाले.

हिंजवडीतील बारामती ज्वेलर्स फोडले

भाजपमधून बाहेर पडलेल्या काही लोकांनी राफेल व्यवहारात तोटा झाला असा आरोप केला आहे. मला अशा लोकांबद्दल काही बोलायचे नाही. कारण ही मंडळी सोयीसोयीने राष्ट्रवादी(नॅशनॅलिस्ट) बनतात असाही टोला जेटली यांनी लगावला.

बीडमध्ये परराज्यातून आलेला ३० लाखांचा गुटखा जप्त