Jalna ACB Trap News | 32 हजाराची लाच घेणार्‍या सरपंचास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Jalna ACB Trap News | जालना जिल्हयातील परतुर तालुक्यातील रोहिना बु. येथील सरपंचास 32 हजार रूपयाची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (ACB Arrest Sarpanch While Taking Bribe). सरपंचाविरूध्द जालना पोलिस दलातील (Jalna Police) परतूर पोलिस स्टेशनमध्ये (Partur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (Jalna ACB Trap News)

जसाराम असाराम कुंभारे Jasaram Asaram Kumbhare (32, रा. रोहिना बुद्रुक, ता. परतुर, जि. जालना) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे (Jalna Bribe Case). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी मौजे रोहिना गावातील शाळेच्या खोलीचे बांधकाम केले होते. त्याचे चार लाख रूपये बिल झाले होते. बिलाच्या चेवर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या सह्या आवश्यक होत्या.(Jalna ACB Trap News)

त्यापैकी ग्रामसेवकाने यापुर्वीच सह्या केलेल्या होत्या. मात्र, सरपंच जसाराम कुंभारे यांनी स्वतःच्या सह्या आणि चेक देण्यासाठी 8 टक्के प्रमाणे 32 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. (Jalna Crime News)

सापळा रचला असताना सरपंच जसाराम आसाराम कुंभारे यांनी सरकारी पंचासमक्ष 32 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूघ्द परतूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे
(Chhatrapati Sambhajinagar ACB SP Sandeep Atole), अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे
(Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस.एस. शेख (PI S.S. Shaikh),
पोलिस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, कृष्णा देठे, चालक प्रविण खंदारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : Jalna ACB Trap News | Anti-corruption caught Sarpanch red-handed for taking bribe of 32,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खून व मोक्का गुन्ह्यातील महिला आरोपीला जामीन मंजूर

Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून मोक्कातील फरारी आरोपीला चिपळून येथून अटक

PMFBY-Crop Insurance | पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन