आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Jamshedji Tata |वॉरन बफे (Warren Buffett), जोफ बेजोस (Joff Bezo), बिल गेट्स (Bill Gates) हे जगातील मोठे दानशूर असले तरी हे लोक भारतीय उद्योग जगता (Business Group) चे पितामह आणि टाटा समुहा (Tata Group) चे संस्थापक जमशेदजी टाटा (Founder Jamshedji Tata) यांच्यापेक्षा मोठे दानशूर नाहीत. जमशेदजी टाटा (Jamshedji Tata) 100 वर्षात जगातील सर्वात मोठे दानशूर आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हुरुन रिपोर्ट आणि एडेलगिव्ह फाऊंडेशनद्वारे तयार जगातील 50 दानशूरांच्या यादीत जमशेदजी यांना मागील 100 वर्षात जगातील सर्वात मोठे दानशूर म्हणून निवडण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे स्थापन टाटा समुहाने सर्वात जास्त 102 अरब डॉलर (सुमारे 75 खरब 70 अरब 53 कोटी 18 लाख रुपये) चे दान दिले आहे.

जगातील शंभर वर्षातील सर्वात उदार दानशूरांची यादी बुधवारी जारी करण्यात आली. यामध्ये मीठापासून सॉफ्टवेयर बनवणार्‍या टाटा समुहाचे जमशेदजी दान देण्यात जगातील इतर उद्योगपतींमध्ये खुप पुढे आहेत.

या यादीत दुसर्‍या नंबरवर बिल गेट्स आणि त्यांची माजी घटस्फोटीत पत्नी मिलिंडा गेट्स आहेत, ज्यांनी 74.6 अरब डॉलरचे दान दिले आहे. तर वॉरेन बफे 37.4 अरब डॉलरसह तिसर्‍या, जॉर्ज सॉरस 34.6 अरब डॉलरसह चौथ्या आणि जॉन डी रॉकफेलर 26.8 अरब डॉलरसह यादीत पाचव्या नंबरवर आहेत.

जमशेदजी यांनी आपली दोन तृतीयांश संपत्ती ट्रस्टला दिली होती, जो शिक्षण, आरोग्यासह अन्य क्षेत्रात आजही काम करत आहे.
त्यांनी 1892 पासूनच दान देण्यास सुरू केले होते. या यादीत एकमेव दूसरे भारतीय उद्योगपती अझीम प्रेमजी आहेत, ज्यांनी सुमारे 22 अरब डॉलरची आपली संपूर्ण संपत्ती दान केली होती.

फाउंडेशनकडून सांगण्यात आले की, 50 लोकांच्या यादीत अल्फ्रेड नोबेल यांचे नाव नाही. मात्र, असे काही लोकांची नावे आहेत जे आश्चर्यजनक नाही.

सध्याचे अरबपती जास्त दान देत नाहीत

अमेरिकन आणि युरोपीय दानशूर मागील शतकात दान देण्यात पुढे आहेत,
परंतु टाटा समुहाचे संस्थापक जमशेदजी जगातील सर्वात मोठे दानशूर आहेत.
अलिकडचे अरबपती ज्या हिशेबाने कमाई करतात,
त्या हिशेबाने दान देत नाहीत. – रुपर्ट हूगवर्फ, हुरुनचे चेयरमन आणि मुख्य संशोधक

सर्वात जास्त अमेरिकन दानशूर
दानशूरांच्या यादीत सर्वात जास्त 39 लोक अमेरिकेचे आहेत.
दुसर्‍या नंबरवर ब्रिटनआहे, ज्यांच्या पाच लोकांचे नाव यादीत आहे.
तर यामध्ये चीनचे तीन लोक आहेत.
यादीत मोठ्या दानशूरांमधील 37 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर केवळ 13 जिवंत आहेत.

50 दानशूरांनी एकुण 832 अरब डॉलर दान दिले
मागील 100 वर्षात या 50 लोकांनी एकुण 832 अरब डॉलरचे दान दिले.
यामध्ये 503 अरब डॉलर संस्थागत दान आणि 329 अरब डॉलर वैयक्तिक दानातून आले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : jamsetji n tata becomes worlds top philanthropist of the last century

 

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST