Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचा निळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये जबरदस्त रॅम्प वॉक

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची प्रसिद्ध स्टार किड असलेली अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जान्हवीची हटके स्टाईल आणि तिच्या अदांवर मोठा चाहता वर्ग घायाळ होत असतो. यावेळी देखील तिच्या एका लुकमुळे व डिझायनर लेहेंग्यामुळे जान्हवी चर्चेत आली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने दिल्लीमध्ये (Delhi) एका फॅशन इव्हेंटमध्ये उपस्थिती दर्शवली होती. तिचे या इव्हेंटमधील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांना तिचा अंदाज पसंतीस पडला आहे.

जान्हवी कपूर नवनव्याने स्टाईल आत्मविश्वासाने परिधान करते. अगदी साध्याशा ड्रेसमध्येही तिचे सौंदर्य खूलुन दिसते. यावेळी देखील अभिनेत्री जान्हवीने दिल्लीमध्ये तिच्या रॅम्प वॉकची (Janhvi Kapoor Ramp walk) सर्वत्र चर्चा आहे.. तिने राजधानी दिल्लीमध्ये पार पडलेल्या इंडियन कल्चर फॅशन वीकमध्ये (Indian Culture Fashion Week) सहभाग नोंदवला होता. यावेळी तिने निळ्या रंगाचा सिक्वेनचा ट्रेडिशनल लेहेंगा स्टाईल केला होता. जान्हवीने ब्रालेट स्टाइल ब्लाउज व फ्लोअर टच लेहेंगा परिधान केला होता. तसेच ओढणी खांद्यावर घेऊन युनिक स्टाईल केली होती. तसेच लाइट मेकअप केला होता. रॅम्प वॉकवर जान्हवी आत्मविश्वासाने चालत होती. तिचा कूल अंदाज व तिचा ड्रेस लक्षववेधी ठरत होता. तिचा हा लूक (Janhvi Kapoor New Look) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा काही दिवसांपूर्वी वरुण धवन (Varun Dhawan) सोबत ‘बवाल’
चित्रपट (Bawaal Movie) प्रेक्षकांच्या भेटीय आला होता. तिच्या या चित्रपटातील अभिनयाचे कौतुक चाहत्यांनी केले आहे.
लवकरच जान्हवी दाक्षिणात्य सिनेविश्वामध्ये देखील पदार्पण करणार आहे. ‘देवारा’ (Devara) या बहुचर्चित दाक्षिणात्य चित्रपटात जान्हवी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. जान्हवी ‘जन गन मन’ (Jana Gana Mana Movie) या चित्रपटात देखील झळकणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणीकंद पोलिस स्टेशन : वाघोलीत वाईन शॉपवर रात्री 11.30 वाजता ‘राडा’; तरुणाच्या डोक्यात घातली बियरची बाटली