Janhvi Kapoor | जान्हवी कपूरचा ‘तो’ व्हिडिओ होतोय जोरात वायरल; ही शांती जरा वेगळीच म्हणत केला व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) ‘मिली’ (Mili) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) काही खास जादू जरी दाखवू शकला नाही तरी जान्हवी चाहत्यांची नेहमीच फेवरेट आहे. तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने तिने चाहत्यांवर एक वेगळीच जादू केली आहे. आईच्या म्हणजेच श्रीदेवीच्या (Sridevi) पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात जान्हवीने (Janhvi Kapoor) पदार्पण केले. जान्हवी नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. आता जान्हवीची नवीन पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. तिने Instagram वर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोराने वायरल होताना दिसत आहे.

 

सुप्रसिद्ध सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om). जान्हवीने याच सिनेमातील आयकॉनिक सीन रिक्रिएट (Recreate The Iconic Scene) केला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) एक मोठ्या झुंबर खाली उभी राहिली आहे. व्हिडिओमध्ये तिचा मित्रही पाहायला मिळतोय. जान्हवी ओम शांती ओम मधील डायलॉग म्हणताना दिसते यावेळी ती म्हणते “याच झुंबरखाली माझ्या शांतीची लाश सापडली” पुढे तिचा मित्र हसतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत जान्हवी ने कॅप्शन मध्ये असे लिहिले की, “ही शांती जरा वेगळीच दिसत आहे”.

 

जान्हवीच्या या पोस्टला युजर्सने भरभरून प्रेम दिले आहे. तर यावर खूप सार्‍या कमेंट्स देखील येत आहेत. एका युजरने असे म्हटले की, “शांतीला पाण्यात उकळले का, ये शांती नाहीये शांतीला आहे”. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जान्हवीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास आत्ताच मिली या चित्रपटातून जान्हवी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर ‘जन गण मन’ (Jan Gan Man)
या चित्रपटांमध्ये देखील जान्हवी दक्षिण स्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)
आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
या व्यतिरिक्त जान्हवी कडे करण जोहरचा (Karan Johar) ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) हा चित्रपट ही आहे.

 

 

Web Title :- Janhvi Kapoor | janhvi kapoor recreates iconic scene from om shanti om video goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा