Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने घेतले बॉयफ्रेंडसोबत तिरुमलाच्या वेंकटेश्वर मंदिरात घेतलं दर्शन

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जान्हवीचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला असून ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर ती नवनवीन फोटोशूट (Janhvi Kapoor) व लाईफ अपडेट शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 21.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटांबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवीचे नाव हे सध्या बिजनेसमॅन शिखर पहारिया (Shikhar Pahariya) सोबत जोडले जात आहे. नुकतीच जान्हवी व शिखर हे कपल तिरुमला येथे मंदिरामध्ये दर्शन घेताना दिसून आले.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor Boyfriend) ही सध्या बिजनेसमॅन शिखर पहारिया याला डेट करत आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा बी टाऊनमध्ये रंगल्या असून हे कपल अनेकदा क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसून येते. जान्हवी व शिखर यांचा सध्या तिरुमला श्री वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जान्हवी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून येत आहे. तिचे सौंदर्य जांभळ्या रंगाचा ट्रेडिशनल ड्रेसमध्ये अधिक खुलले आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरचा हा अंदाज चाहत्यांना आवडला असून त्या दोघांची जोडी देखील प्रेक्षकांना आवडली आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) व
बोनी कपूर (Boney Kapoor) यांची थोरली मुलगी असून तिने आता बॉलीवुडमध्ये
आपली ओळख निर्माण केली आहे. जान्हवीने 2018 साली ‘धडक’ (Dhadak)
या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये पदार्पण (Janhvi Kapoor Bollywood Debut) केले.


त्यानंतर जान्हवीने अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा
‘बवाल’ हा चित्रपट (Bawaal Movie) ओटीटी वर रिलीज झाला होता. तसेच जान्हवी ही अनेक
बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकणार आहे. लवकरच ती ‘देवरा’ (Devara Movie),
‘दोस्ताना 2’ (Dostana 2), ‘बॉम्बे गर्ल’ (Bombay Gir) आणि ‘जन गण मन’ (Jana Gana Mana movie)
या चित्रपटांमध्ये (Janhvi Kapoor Upcoming Movie) भूमिका साकारताना दिसणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

ACB Trap News | 1 लाख 30 हजार रुपये लाच घेताना गटविकास अधिकाऱ्यासह (BDO) तिघेजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात