Jayant Patil | शिवाजी महाराजांप्रमाणे CM एकनाथ शिंदेंनीही थेट बाहेर पडायला हवं होतं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jayant Patil | दिल्लीत निती आयोगाच्या (Niti Aayog) बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना मागच्या रांगेत स्थान दिल्याने, तसेच हा फोटो व्हायरल होत असल्याने राज्यात हा मुद्दा चर्चेचा विषय झाला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिसत आहेत. मात्र, मुख्यमंत्री सर्वात शेवटच्या रांगेत आहेत. यावरून राष्ट्रवादीने (NCP) जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिल्ली दरबारात औरंगजेब (Aurangzeb) आणि छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यातील प्रसंगाची आठवण करून दिली आहे.

 

रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक (Seventh Governing Council Meeting) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री (Union Minister) उपस्थित होते. या बैठकीच्या व्हायरल फोटोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात मागच्या रांगेत उभे केल्याचे दिसत असल्याने चर्चेचा विषय झाला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar), आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले की, औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज यांना दुसर्‍या रांगेत स्थान देण्यात आले होते. तेव्हा, शिवाजी महाराजांनी तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता, त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांनीही बाहेर पडणे गरजेचे होते. मी केवळ उदाहरण सांगितले. मी कुणालाही औरंगजेबाची उपमा दिलेली नाही. ती सभा मोदींची होती, मला नवा वाद उभा करायचा नाही. प्रोटोकॉल नुसार अल्फाबेट नुसार अरेंजमेंट असते, असेही त्यांनी सांगितले.

 

आमदार आमोल मिटकरी यांनी या प्रकरणावरून टीका करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे
की, ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा‘ हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि
शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत?
प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा हा फोटो आहे, शिंदे साहेब वाईट वाटले.

 

Web Title :- Jayant Patil | like shivaji maharaj eknath shinde should have gone straight out from niti ayog delhi meeting says ncp leader jayant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | इंदापुर पोलीस ठाण्यात FIR ! लग्नादिवशी प्रियकर पळाला, मुलाच्या मामाने मुलीला विषारी पेढा भरवला अन्…

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

 

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता