JEE Mains Result March 2021 : जेईई मेन 2021 मार्च सेशनचा रिझल्ट घोषित, 13 कँडिडेट्सला मिळाले 100 % गुण

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने आज इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा जॉईंट एंट्रन्स एग्झामिनेशन (जेईई मेन 2021) परीक्षेच्या मार्च सेशनच्या रिझल्टची घोषणा केली आहे.

एनटीएने म्हटले आहे की, 13 कँडिडेट्सने जेईई मेन्स मार्च सेशनमध्ये 100 टक्के मार्क्स मिळवले आहेत. परीक्षार्थी या लिंकवर जाऊन – jeemain.nta.nic.in आपला रिझल्ट पाहू शकतात.

यापूर्वी एनटीए द्वारे मंगळवारीचे जेईई (जॉईंट एंट्रन्स एग्झामिनेशन) मेन परीक्षा 2021 च्या दुसर्‍या टप्प्याच्या परीक्षेची फायनल अन्सर की जारी केली आहे. एनटीएने ही अन्सर की आपल्या jeemain.nta.nic.in वर जारी केली आहे.

मार्चमध्ये आयोजित केली होती ही परीक्षा
जेईई मेन परीक्षा 2021 च्या दुसर्‍या टप्प्यातील परीक्षेचे आयोजन 16 मार्च 2021 पासून 18 मार्च 2021 पर्यंत करण्यात आले होते. या परीक्षेची प्रोव्हिजनल अन्सर-की एनटीए द्वारे 20 मार्च 2021 ला जारी करण्यात आली होती, तर जारी केलेल्या प्रोव्हिजनल अन्सर-की वर उमेदवारांकडून ऑनलाइन आक्षेप 22 मार्च 2021 ला दुपारी 01:00 वाजेपर्यंत मागवण्यात आले होते. या परीक्षेच्या ऑनलाइन अर्जाची सुरुवात 02 मार्च 2021 पासून आणि अर्जाची अंतिम तारीख 06 मार्च 2021 ठरवण्यात आली होती.