जेफ बेजोस 5 जुलैरोजी सोडणार Amazon चे सीईओ पद, अँडी जेसी घेणार त्यांची जागा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन (Amazon) चे सीईओ जेफ बेजोस यांनी आपले पद सोडण्याच्या तारीखेची घोषणा केली आहे. बेजोस 5 जुलैला आपल्या पदाचा राजीनामा देतील. 27 वर्षापूर्वी याचदिवशी अमेझॉन (Amazon) कंपनीची स्थापना झाली होती. बेजोस यांच्या ठिकाणी अमेझॉन वेब सर्व्हिसेसचे हेड अँडी जेसी सीईओ पद सांभाळतील. यापूर्वी फेब्रुवारीत कंपनीने म्हटले होते की, बेजोस वर्षाच्या अखेरपर्यंत आपले पद सोडतील.

Pune : 7 वर्षाच्या चिमुकलीला वडिलांकडून बेदम मारहाण, बापाला अटक

Pune : 7 जणांची 32 कोटींची फसवणूक ! वेल्थ प्लॅनेट लि. (यु.के.) कंपनीचा CEO अभिजीत कुलकर्णी, टिम लिडर प्रज्ञा कुलकर्णी, CFO अनिकेत कुलकर्णी, COO श्वेता नातु आणि नितीन पाष्टे विरूध्द डेक्कन पोलिस ठाण्यात FIR

बेजोस यांनी अमेझॉनच्या शेयरधारकांच्या बैठकीत म्हटले माझ्यासाठी 5 जुले तारीख खुप महत्वाची आहे. 27 वर्षापूर्वी याच तारखेला आपण अमेझॉन कंपनीची सुरूवात केली होती. सीईओचे पद सोडल्यानंतर बेजोस अमेझॉनचे एग्झीक्युटिव्ह चेयरमनचा कार्यभार सांभाळतील आणि सोबतच नवीन प्रोडक्ट आणि इनिशिएटिव्हवर फोकस करतील. ते आपले इतर व्हेन्चर्स जसे बेजोस अर्थ फंड, ब्ल्यू ओरिजिन स्पेस शिप कंपनी, अमेझॉन डे वन फंड आणि द वॉशिंग्टन पोस्टवर फोकस करण्याची योजना बनवत आहेत.

1994 मध्ये गॅरेजमधून सुरूवात
जेफ बेजोस यांनी 1994 मध्ये आपल्या गॅरेजमध्ये एक ऑनलाईन बुकस्टोअर म्हणून अमेझॉन सुरू केले होते. आज ती ऑनलाइन रिटेलची दिग्गज कंपनी आहे जी जगभरात सर्व प्रकारची उत्पादने विकते आणि वितरित करते. याशिवाय स्ट्रीमिंग, म्युझिक आणि टेलिव्हिजन, क्लाऊड कम्प्यूटिंग, रोबोटिक्स, एआय सारख्या क्षेत्रात सुद्धा कंपनी काम करत आहे.

Also Read this : 

SBI घरबसल्या देत आहे या खास सुविधा, मुलांना मिळेल थेट फायदा; जाणून घ्या कसा

Corona Side Effects : रिसर्चमध्ये दावा – कोरोनातून बरे झालेल्या 14% रूग्णांना होत आहेत नवीन आजार

कोरोनाशी लढा : आज मिळणार 2-डीजी औषधाचा 10 हजार पाऊचवाला दुसरा साठा

Cocktail Drug in India : आजपासून मिळू शकते कॉकटेल ड्रग, केवळ एक डोसने होईल कोविडचा उपचार, जाणून घ्या किंमत

1 जूनपासून बदलणार हे नियम, ज्यांचा होईल तुमच्यावर परिणाम; बँक व्याजदर आणि एलपीजीच्या दरात सुद्धा होणार का बदल?