जेजुरीत ग्रामीण रुग्णालयात होणार 23 प्रकारची रुग्ण तपासणी

जेजुरी : जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आमदार संजय जगताप यांनी आमदार फंडातून सुमारे चार लाख रुपये खर्चाचे आरोग्य तपासणीचे यंत्र दिले आहे.आज ग्रामीण रुग्णालयामध्ये या यंत्राचा शुभारंभ आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे,नगराध्यक्षा वीणा सोनवणे,उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे,नगरसेवक अजिंक्य देशमुख,गणेश शिंदे,बाळासाहेब दरेकर,बाळासाहेब सातभाई,हेमंत सोनवणे,ग्रामीण रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ.प्रमोद वाघ,हरिभाऊ रत्नपारखी,अनंत देशमुख आदी उपस्थित होते.

मधुमेह,रक्तदाबासह सुमारे २३ प्रकारची तपासणी यावेळी होणार असल्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. कोरोनाच्या या काळात नागरीकांनी तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. आपल्याला इतर आजार काय आहेत हे माहीती होण्यासाठी कमी वेळेत व मोफत तपासणी करता यावी यासाठी हे यंत्र जेजुरी ग्रामीण रुग्णालयासाठी देण्यात आले आहे. यामधून २३ प्रकारची तपासणी पाच मिनीटामध्ये होणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.सासवड नंतर आता जेजुरी,नीरा व हवेली तालुक्यात दोन ठिकाणी हे यंत्र दिले जात असल्याची माहीती त्यांनी दिली.

आमदार संजय जगताप यांनी पालिकेसाठी औषध फवारणी यंत्र नुकतेच प्रदान केले आहे.तर नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये आधुनिक पध्दतीची तपासणी होणाऱ्या या यंत्राचा जेजुरीकरांना चांगला फायदा होईल असे नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले.हरिदास रत्नपारखी यांनी ग्रामीण रुग्णालयातील विविध योजनांची माहीती दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like