Jeremy Ruehlemann Pass Away | जगप्रसिद्ध मॉडेल जेरेमीचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन

पोलीसनामा ऑनलाईन : एका प्रसिद्ध मॉडेलच्या निधनाच्या (Jeremy Ruehlemann Pass Away) बातमीने फॅशन विश्वात खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या मॉडेलचं नाव जेरेमी रुहेलमन असं आहे. जेरेमी रुहेलमन याच्या निधनाची माहिती त्याच्या मित्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. जेरेमीचा मित्र आणि डिझायनर ख्रिश्चन सिरियानो याने त्याच्या मृत्यूची (Jeremy Ruehlemann Pass Away) बातमी शेअर केली. सिरीयानो याने जेरेमीचा फोटो पोस्ट करत “मी यापूर्वी कधीही असं काहीही पोस्ट केलेलं नाही. पण इतकं सुंदर मन असलेला मित्र गमावणं खरोखर खूप कठीण आहे,” असं त्याने लिहिलं आहे.

ख्रिश्चन सिरियानो पुढे भावना व्यक्त करत म्हणाला, ‘हे फक्त जेरेमी साठी ,सगळ्यात सुंदर असा माणूस ज्याने प्रत्येकाला प्रेम दिलं,त्यामागे काहीही कारण असो मला माहित आहे आपण पुन्हा भेटू. पण आता तुला मला मिठी मारायची आहे. आम्ही प्रत्येक जण तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो…’ असं म्हणत ख्रिश्चन सिरियानो याने मित्र जेरेमी रुहेलमन याच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.

जेरेमी रुहेलमनने पेरी एलिस आणि सुपरड्री यांच्यासाठी मॉडेलिंग केलं होतं.
जेरेमी रुहेलमन कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा.
त्याच्या निधनाच्या काही दिवस आधी सोशल मीडियावर सक्रिय होता, त्याने २० जानेवारी रोजी एक फोटोशूट
केलं होतं. तिथले फोटो त्याने आपल्या अकाउंटवर शेअर केले होते. सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक
चाहते जेरेमी याला श्रद्धांजली वाहत आहेत.जेरेमीच्या निधनाचं कारण अद्यापि समोर आलं नाही .

Web Title :- Jeremy Ruehlemann Pass Away | model jeremy ruehlemann dies at 27 know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोटजातीत लग्न केल्याने श्रीगौड ब्राह्मण समाजाच्या जातपंचायतीने टाकले वाळीत, बिबवेवाडी पोलिसांकडे तक्रार

Devendra Fadnavis | ठाकरे-आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले – ‘प्रकाश आंबेडकरांना माहिती नाही की…’