Reliance Jio चे ‘हे’ 4 किफायतशीर प्रीपेड प्लान बंद !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनः – देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने जिओचे 4 प्लान बंद केले आहेत. Jio कडून बंद केलेले 4 ही प्लान अगदी किफायशीर होते. हे प्लान बंद झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे बोलले जात आहे.

रिलायन्सने जिओ फोनचे 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपये असे प्लान बंद केले आहेत. या सेगमेंटमध्ये आता जिओकडे 75, 125, 155 आणि 185 रुपयांचे प्लान उपलब्ध करून दिले आहेत. 99 रुपये,153 रुपये, 297 आणि 594 रुपये या प्लानची वैधता अनुक्रमे 28 दिवस, 84 आणि 168 दिवस होती. तसेच यातील तीन प्लानमध्ये जिओ टू जिओ आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिट्सची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

75 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एमबी डेटा आणि 50 एसएमएस ऑफर केले जात आहेत. 125 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 500 एमबी डेटा आणि 300 एसएमएस मिळणार आहेत. तर 155 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस ऑफर केले जात आहेत. तर 185 रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस ऑफर केले जात आहेत. या सर्व प्लानची वैधता 28 दिवसांची राहणार आहे.