Jio, Airtel, Vi, BSNL देतायेत स्वस्तात 84 दिवसांच्या व्हॅलिडीटी प्लॅन, 600 रुपयांपेक्षा कमी आहे किंमत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   प्रीपेड वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी 28 दिवसांचे रिचार्ज करण्याची झणझट असते, अशा परिस्थितीत अशा काही योजना आहेत, ज्यांची वैधता 84 दिवस आहे. तर बीएसएनएल 90 दिवसांची मुदत देते. जिओ 849 दिवसांमध्ये 84 दिवसांची वैधता आणि अमर्यादित कॉल आणि डेटा ऑफर करते. जाणून घेऊया

रिलायन्स जिओ, एअरटेल, व्ही आणि बीएसएनएलच्या अशाच रीचार्ज प्लॅनबद्दल …

एअरटेल रिचार्ज योजना

एअरटेल 598 रुपयांमध्ये 84 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग देते. या रिचार्ज योजनेत दररोज 1.5 जीबी इंटरनेट डेटा आणि 100 sms ची सुविधा देते. अतिरिक्त वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास या रिचार्जजवर Mobile Edition Free 30 days Trial, Airtel Xstream Premium, Free Hellotunes, Wynk Music ची सुविधा मिळते.

रिलायन्स जिओ रिचार्ज योजना

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ 599 रुपयांच्या रिचार्जवर 84 दिवसांची वैधता देत आहे. या योजनेत दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. या संपूर्ण योजनेत 168 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध आहे.तसेच दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. यात JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity, JioCloud ची सदस्यता देखील आहे.

Vi वोडाफोन-आयडिया रिचार्ज योजना

व्होडाफोन-आयडियाचा 599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे, ज्याची वैधता 84 दिवस आहे. या योजनेत अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. तसेच, दररोज 1.5 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. तसेच दररोज 100 एसएमएस दिले जातात. अ‍ॅप ऑफरवर यात बिंज ऑल नाईट ऑफर + अतिरिक्त 5 जीबी आहे. त्याच्या मदतीने आपण सकाळी 12 वाजता ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा वापरू शकता. तसेच 5 जीबी अतिरिक्त इंटरनेट डेटा मिळतो.

बीएसएनएल रिचार्ज योजना

बीएसएनएल 485 रुपयांना 905 दिवसांची वैधता देते. दररोज 1.5 जीबी इंटरनेट डेटा मिळतो आणि तो दिल्ली मुंबईच्या रोमिंगवरही काम करेल. त्यात अमर्यादित व्हॉईस कॉल उपलब्ध असतील.