Jitendra Awhad | सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा, छत्रपतींच्या वारसांना अशी वागणूक तर बाकीच्यांचे काय?, संयोगिताराजेंच्या ‘त्या’ पोस्टनंतर जितेंद्र आव्हाडांचा संतप्त सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याविषयी वेदोक्त प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणेक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला. त्यावेळी अनेक रोषांना सामोरे जावे लागले होते. आता शाहू महाराजांच्या वंशज संयोगिताराजे छत्रपती (Sanyogeetaraje Chhatrapati) यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन हा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. यानंतर आता जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे या प्रकरणात आक्रमक झाले आहेत. काळाराम मंदिरातल्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा समोर आल्याचे आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हटलं आहे.
छत्रपती घराण्याला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही का ?
सनातनींच्या धर्मात बहुजनांना जागा नाही का ? pic.twitter.com/rBRD9us6Vk— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे यांच्या पूजेवेळी वेदोक्त मंत्र ऐवजी (Vedokta Mantra), पुराणोक्त मंत्र (Puranokta Mantra) म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्यांना सुनावलं, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यांनाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही? त्यांनी उत्तर दिलं नाही तुम्हाला अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबरोबर सनातन मनुवादी (Sanatan Manuvadi) असे वागले. छत्रपती संभाजी महाराजांना (Chhatrapati Sambhaji Maharaj) हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले ते हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शूद्र समजतात. बरं झाले हे छत्रपतींच्या वारसांसोबत झालं. जे मी सांगत तो हाच सनातन धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.
काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा
छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले… pic.twitter.com/F3FUCd8Qpi— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 31, 2023
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, अचानक हिंदू धर्म गायब करुन आम्ही सनातन धर्मीय असल्याचे सांगण्याचे कारण हे आहे. कट्टरता आणायची आहे. अजून कुठला पुरावा हवा. आजचे छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर तुम्ही आम्ही कुठे? बहुजनानो जागे व्हा. याच सनातन वाद्यांनी बुद्धांना, जैनांना, बसवेश्वरांना सतावलं, याच सनातन वाद्यांनी ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना जीवे मारलं, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा, तुकाराम महाराज यांना छळलं. शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) राज्याभिषेक नाकारला. संभाजी महाराजांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. महात्मा फुले (Mahatma Phule) यांनी शाळा उघडू नये आणि त्यांच्या पत्नीने शाळेत जाऊ नये म्हणून त्यांच्या खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केला, त्यांना दगड मारले. तेव्हापासूनच हे वेदोक्त प्रकरण निघालं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच मी राणीसाहेबांचे आभार मानतो त्यांनी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिलं महाराष्ट्रात नेमकं काय चालू आहे. हा सनातनी कट्टरतावाद महाराष्ट्रातील दंगलींना कारणीभूत असल्याचे आव्हाड म्हणाले.
काय आहे प्रकरण?
नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे.
तसंच नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणून दिले नाहीत असा आरोप केला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Web Title :- Jitendra Awhad | after sanyogeetaraje post on instagram jitendra awad expressed his anger via tweet
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | भाजप नेते गणेश बिडकर यांच्याकडे 25 लाखाच्या खंडणीची मागणी, जाणून घ्या प्रकरण
Ready Reckoner Rate | 2023-24 मध्ये रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ नाही? जाणून घ्या सविस्तर
Ajit Pawar | रोहित माझ्या मुलासारखा, मी असं का करु?, अजित पवारांची स्पष्टोक्ती