Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर दुखी होऊन मी राजीनामा देणार आहे, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले होते. मात्र आव्हाडांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे यायला हवा होता असा टोला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी लावला होता. त्याला जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) उत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, मी अनुभवाने राहुल नार्वेकर यांच्यापेक्षा मोठा आहे. मला कायद्याचे त्यांच्या एवढंच ज्ञान आहे. मी माझा राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे. आता पुढे ते ठरवतील. माझ्या राजीनाम्याचा पूर्ण निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोपवला आहे. मी त्यांना कळवलं, पण आधी मला येऊन भेट असा निरोप मला शरद पवारांनी दिला. त्यामुळे मी त्यांची भेट घेईन असं त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार
(Ajit Pawar) यांनी आव्हाडांची समजूत काढली आहे. ठाण्यातील एका पूल उद्घाटन कार्यक्रमादरम्यान
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते.
या प्रकरणी त्या महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, याविरोधात जितेंद्र आव्हाडांनी
(Jitendra Awhad) ठाणे कोर्टात धाव घेतली होती. त्यांना या प्रकरणी दिलासा मिळाला आहे.
ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन दिला गेला आहे.

Web Title :-  Jitendra Awhad | i have submitted my resignation to my father pawar he will decide jitendra awadas reply to rahul narvekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update