Jitendra Awhad | जामीन मिळताच आव्हाडांची प्रतिक्रिया; “…मला संपवण्यासाठी ठरवून”

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- ठाण्यातील एका पूल उदघाटनाची कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केले होते. या प्रकरणी त्या महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, याविरोधात जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ठाणे कोर्टात धाव घेतली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ठाणे कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन दिला गेला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. ठाण्यामधील मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

मला संपवण्यासाठी ठरवून हे खालच्या पातळीवरील राजकारण केलं जातं असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे. उद्धाटनाप्रसंगी एखाद्या महिला कार्यकर्त्याला पोलिसांनी हात लावला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला.

मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये एसीपी सोनाली ढोले यांनी विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे होता.
‘प्रकरण संवेदनशील आहे. हाताने बाजूला केले आहे. आरोपी राजकीय बलाढ्य व्यक्ती आहे त्यामुळे अटक पूर्व
जामीन दिल्यास गुन्ह्यावर परिणाम होईल. त्यांना अटक पूर्व जामीन देऊ नये.’ अशी मागणी ढोले यांनी केली होती.
तसेच कलम ३५४ अंतर्गत आरोप दाखल करण्याची मागणी केली होती.
तर गजानन चव्हाण (Gajanan Chavan) यांनी आव्हाडांच्या वतीने युक्तिवाद केला.
न्यायाधिशांना घडलेल्या प्रकाराची क्लिप दाखवली गेली. आव्हाड यांच्या वकिलांनी हा गुन्हा ३५४ कलमांतर्गत दाखल होऊ शकत नाही असे सांगितले. जितेंद्र आव्हाडांनी तक्रारदार महिलेला फक्त गर्दीतून बाजूला केले असे सांगितले. कलम ३५४ (Article 354) महिलेच्या शालीनतेचे संरक्षण करते.

Web Title :-  Jitendra Awhad | ncp jitendra awhad reaction after court grants him bail in molestration case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठीतील क्रांती चौकात दोन गटांत कोयत्याने मारामारी