Ram Kadam | श्रद्धा वालकर हत्येमागे लव्ह जिहाद आहे का? राम कदम यांची चौकशीची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – श्रद्धा वालकर (Sharadha Walkar) या तरुणीची दिल्लीत तिच्या प्रियकराने आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) निर्घून हत्या केली आहे. भाजपने या हत्येला राजकीय रंग दिला आहे. या हत्येसंदर्भात भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी भाष्य केले आहे. या हत्येमागे लव्ह जिहाद (Love Jihad) चे काही नाते आहे का, याचा तपास दिल्ली पोलिसांनी करावा, असे राम कदम (Ram Kadam) म्हणाले आहेत.

ज्या निर्दयतेने श्रद्धा हिचा खून करण्यात आला आणि तिच्या शरीराचे 35 तुकडे केले गेले, त्यामुळे संपूर्ण देश अवाक झाला आहे. ही हत्या खासगी असू शकत नाही. या हत्येमागे लव्ह जिहाद (Love Jihad) सारखा प्रकार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास करावा. वारंवार अशा स्वरुपाच्या घटना देशात घडत आहेत. त्यामुळे यामागे कोण आहे, कोणाचे षड्यंत्र आहे, त्याचा पर्दापाश झाला पाहिजे. त्यामुळे हे प्रकरण हत्येपुरते गृहीत न धरता, त्याची पाळेमुळे लव्ह जिहादपर्यंत जातात का, हे शोधणे गरजेचे आहे. आम्ही श्रद्धाच्या कुटुंबाच्या मागे उभे आहोत. श्रद्धाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असे यावेळी राम कदम (Ram Kadam) म्हणाले.

तसेच हिंदू नेहमी संयमी राहिले आहेत. दरवेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास आम्हाला भाग पाडू नका.
आम्ही श्रद्धाच्या कुटुंबाच्या मागे उभे आहोत. त्यामुळे या प्रकरणाता लव्ह जिहादच्या दृष्टीने तपास झाला पाहिजे,
असे राम कदम यावेळी म्हणाले. राम कदम यांच्या नेतृत्वात मुंबईत श्रद्धा वालकरच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले होते.

Web Title :- Ram Kadam | mumbai bjp ram kadam reaction on shraddha walker murder case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
हे देखील वाचा