Jitendra Awhad | ‘माझ्यावरील गुन्हा सिद्ध करताना पोलिसांना नाकी नऊ येईल’ – आ. जितेंद्र आव्हाड

ठाणे: पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) भाजपच्या पदाधिकारी रीदा रशीद (Rida Rashid) यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका देखील करण्यात आली. आज ते ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आव्हाड यांनी आज (दि. 16) ठाणे न्यायालयात हजेरी लावली. जामीन प्रक्रियेतील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आव्हाड यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. आव्हाडांना (Jitendra Awhad) जामीन देताना अटी शर्तींवर स्वाक्षरी करण्यासाठी आणि जामीनदाराला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आव्हाड ठाणे न्यायालयात आले होते. यावेळी आव्हाड म्हणाले, पोलिसांना हवे ते सहकार्य मी करणार आहे. पोलिसांना हा गुन्हा सिद्ध करताना नाकी नऊ येतील. त्यांना गुन्हा सिद्ध करता येणार नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा
प्रयोग बंद पाडला होता. त्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या बारा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.
त्यांच्यावर चित्रपट बंद पाडणे आणि प्रेक्षकांना मारहाण करणे आदी आरोप ठेवण्यात आले होते.
त्यांची त्याप्रकरणी जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे
(CM Eknath Shinde) यांच्या एका कार्यक्रमात महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यामुळे ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. त्यावर देखील त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
त्यामुळे तीन दिवसांत या हुकुमशाही सरकारने माझ्यावर दोन खोट्या केसेस दाखल केल्या आहेत,
असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. तसेच त्यांनी आपण राजीनामा देत आहे, असे देखील म्हंटले होते.
अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

Web Title :-  Jitendra Awhad | So Hard To Police Prove That Crime Register Against Me : Jitendra Awhad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | मटणाच्या सुपात भात आल्याने खानावळीतील वेटरचा खून; पिंपरी-चिंचवडमधील घटना

Disha Patani | दिशा पटानीने टू-पीस बिकिनी घालून दिली बोल्ड पोज, फोटो पाहून कमेंट्सचा पडला पाऊस

Maharashtra Police | धक्कादायक ! ‘चरस’च्या तस्करी प्रकरणी 2 पोलिस कर्मचारी गोत्यात