Jnanpith Awards | गीतकार गुलजार आणि जगतगुरु रामभद्राचार्य यांना २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

मुंबई : Jnanpith Awards | प्रसिद्ध उर्दू कवी आणि चित्रपट गीतकार गुलजार आणि संस्कृत अभ्यासक जगतगुरु रामभद्राचार्य यांना २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती निवड समितीने दिली आहे. या दोन्ही व्यक्ती आपआपल्या क्षेत्रात खुपच प्रसिद्ध आहेत. गुलजार यांनी अनेक चित्रपटांमध्ये गीत लेखनासह गझल आणि काव्य क्षेत्रात प्रसिद्धी मिळवली आहे. तर, जन्मापासून दृष्टी नसलेले जगद्गुरू रामभद्राचार्य संस्कृत भाषा आणि वेद-पुराणांचे प्रकांड पंडित आहेत.(Jnanpith Awards )

धर्मचक्रवर्ती, तुलसीपीठाचे संस्थापक पद्मविभूषण रामभद्राचार्य यांनी धर्मग्रंथांचा हवाला देत रामललाच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात साक्ष दिली होती. त्यांचे खरे नाव गिरीधर मिश्रा आहे, त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५० रोजी उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात झाला. ते रामानंद संप्रदायातील सध्याच्या चार जगद्गुरू रामानंदाचार्यांपैकी एक आहेत आणि सन १९८८ पासून ते या पदावर आहेत.

तर गुलजार यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील कार्यासाठी ओळखले जाते. हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या गाण्यांनी प्रेमाचा
सुगंध निर्माण करणाऱ्या गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३६ रोजी दिना, जिल्हा झेलम, पाकिस्तान येथे झाला.
पुखराज, एक बूंद चांद, चौरस रात, रवी पार, कुछ और नज्मे, यार जुलाहे इत्यादी त्यांच्या प्रमुख कलाकृती प्रसिद्ध आहेत.

गुलजार यांचे पूर्ण नाव संपूरण सिंग कालरा आहे. ते कवी, गीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत.
त्यांच्या वडिलांचे नाव माखन सिंग कालरा आणि आईचे नाव सुजन कौर होते. फाळणीनंतर गुलजार यांचे कुटुंब भारतात आले.

मुंबईतील वरळी येथे त्यांच्या संघर्षमय दिवसांमध्ये गुलजार यांनी कार मेकॅनिक म्हणून काम केले होते. चित्रपट अभिनेत्री राखीसोबत त्यांनी विवाह केला. बिमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातील मोरा गोरा अंग लै ले हे गुलजार यांचे पहिले गाणे होते.

याशिवाय सदमा चित्रपटातील ए जिंदगी गले लगा ले, आंधी चित्रपटातील तेरे बिना जिंदगी से, गोलमाल मधील आने वाला पल जाने वाला है, खामोश चित्रपटातील हमने देखी है आंखो से, मासूम चित्रपटातील तुझसे नाराज नही जिंदगी, परिचय चित्रपटातील मुसाफिर हूँ यारों, थोडी सी बेवफाई चित्रपटातील हजार राहे मूड के देखी, इत्यादी गाणी प्रसिद्ध आहेत.

आनंद, गुड्डी, बावर्ची, नमक हराम, दो दूनी चार, खामोशी, सफर या चित्रपट कथा लिहिल्या.
याशिवाय ते मेरे अपने चित्रपटाचे निर्माते होते. तसेच कोशिश, परिचय, अचानक, आंधी, खुशबू, मौसम, अंगूर, लिबास,
माचीस, हु तू तू इत्यादी चित्रपट केले. कोशिश, मौसम आणि इजाजत या चित्रपटांसाठी त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्कार आणि
४७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. याशिवाय त्यांना २००४ मध्ये पद्मभूषण आणि २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पाच मिनिटात लाईटचे काम करुन दे, काका-पुतण्याला टिकावाने मारहाण

Sharad Pawar On Ajit Pawar | अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवारांचे थेट उत्तर; ”हा लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसतो”

भांडण सोडवल्याच्या रागातून तरुणीला लोखंडी रॉडने मारहाण, चंदननगर परिसरातील प्रकार

पुणे : पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून मारहाण करुन महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

दरोड्याच्या तयारीतील टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, कोयते जप्त

Pune Police News | पुणे : महिला पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित

पुणे : पाठलाग करुन महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग, आरोपीला अटक

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून बेकायदा फ्लॅट बळकावले; शरद बारणे आणि बाळासाहेब बारणेंच्या विरूध्द गुन्हा दाखल