Pune Khadak Crime | पुणे : पोलिसांनी कारवाई केल्याच्या रागातून मारहाण करुन महिलेचा विनयभंग, तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadak Crime | पूर्वी झालेल्या भांडणावरुन पोलिसांत केलेल्या तक्रारीचा व पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग मनात धरु तीन जणांनी घरात घुसून आई आणि मुलीला अश्लील शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांवर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत घडला आहे.

याबाबत भवानी पेठेत राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सुशिल गाडे, मानसी सावंत, सागर सावंतचा लहान भाऊ पतु सावंत यांच्यावर आयपीसी 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे फिर्यादी यांच्या आईने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. यावरुन पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता.

शनिवारी (दि.3) सकाळी फिर्यादी व त्यांची आई घरात असताना आरोपी घरात आले.
पोलिसांत तक्रार केल्याच्या आणि पोलिसांनी कारवाई केल्याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी यांच्या आईला
अश्लील शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपींनी त्यांना खाली पाडून साडीचा
पदर ओढून मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी यांची आई मध्ये आली असता सुशिल गाडे याने आईच्या छातीवर जोरात
फटका मारला. तर पतु सावंत याने फिर्यादी यांच्या आईचा पदर ओढून कानशिलात लगावली.
तसेच मानसी सावंत हिने फिर्यादी यांच्या आईला अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण
केल्याचे फिर्यादीत नमूद केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाईक करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Asha Bhosle Granddaughter Zanai | आशा भोसलेंची नात ‘जनाई’चा भन्नाट डान्स पाहुन चाहते अवाक, म्हणाले – ”माधुरी-ऐश्वर्या देखील फेल”

Manoj Jarange Patil | ‘कुणबी नोंदी नसणाऱ्यांना आयोगाच्या अहवालानुसार मराठा आरक्षण अमान्य’ : जरांगे

State Backward Classes Commission On Maratha Reservation | राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर, १० टक्के मराठा आरक्षणाचा होऊ शकतो कायदा

Paytm-Axis Bank | Paytm चा Axis बँकेशी करार, १५ मार्चनंतर सुद्धा चालणार QR, साऊंड बॉक्स आणि EDC

3 Cops Dismissed In Pune | पुणे: हवालाचे 45 लाख रुपये लुटणारे 3 पोलीस कर्मचारी बडतर्फ; अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांची कारवाई