JNU विद्यार्थ्यांना UGC चा दिलासा, भरणार वाढीव शुल्क

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी शुक्रवारी (दि.10) जेएनयूचे कुलगुरू आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकिमध्ये असा निर्णय घेण्यात आला की तुर्त जेएनयूमधील वाढीव शुल्क वसूल केले जाणार नाही. वाढीव शुल्काचा भार विद्यापीठ अनुदान आयोग उचलेल.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी सांगितले की, वाढीव शुल्काव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाचे शुल्क घेतले जाणार नाही. खरे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. डी.पी. सिंह यांची भेट घेऊन वाढीव तसेच वसतिगृह शुल्काचा भार युजीसीने उचलावा अशी मागणी केली. मंत्रालयाची ही मागणी युजीसीने मान्य केली आहे. खरे म्हणले की त्यांनी शुक्रवारी मंत्रालयात आलेल्या जेएनयूएसयूची अध्यक्ष आइशी घोष आणि अन्य विद्यार्थ्यांना ही माहिती दिली.

खरे यांनी या विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेऊन नियमित वर्गाला उपस्थित राहण्याचे आवाहन करत विनंती केली. जेएयूचे कुलगुरु एम. जगदीश कुमार, जेएनयूचे कुलसचिव आणि वसतिगृहाचे रेक्टर खरे यांना भेटण्यासाठी सकाळी साडेअकरावाजता मंत्रालयात आले होते. जेएनयू प्रशासनाने एमएचआरडीला सांगितले की विद्यापीठात परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र विद्यार्थी अजूनही फीवाढ मागे घेण्याच्या मागणीवर आडून बसले आहेत. खरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आइशी घोष हिने सांगितले की, विद्यार्थी कुलगुरूंना हटवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. शुल्कवाढी विरोधातील आंदोलन मागे घण्यासंदर्भात निर्णय नंतर घेतला जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/