Job Alert | ‘या’ कंपनीकडून केली जाणार 5000 पदांची भरती, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Job Alert | केरळ (Kerala) येथील मलाबार गोल्ड आणि डायमंडसने (Malabar Golds And Diamonds) रिटेल्स ऑपरेशन्ससाठी देशात तब्बल 5 हजार पदांची भरती (Vacancies) करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मंगळवारी रिटेल ज्वेलरी, सेल्स, स्टोअर ऑपरेशन्स आणि अकाउंट पदांची घोषणा केली आहे. यापैकी निम्म्या पदांवर महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यांनाही मिळणार संधी
फ्रेश बीटेक, एमबीए उमेदवारांना ज्वेलरी रिटेल्स सेल्स आणि ऑपरेशन्स या कामाचा अनुभव मिळावा यासाठी इटर्नशीप (Internship) आणि ट्रेनीशीपचाही (Traineeship) पर्याय देण्यात आला आहे. असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

या विभागात केली जाणार भरती
यासंदर्भात मलाबार गोल्डने दिलेल्या निवेदनानुसार, ही पदभरती प्रामुख्याने डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, डिजीटल मार्केटिंग, ज्वेलरी उत्पादन, सप्लाय चेन मॅनेजमेंट, मर्चंटडायझिंग, प्रोजेक्ट एक्जिक्युशन, फायनान्स अ‍ॅण्ड अकाउंटस, बिझनेस अ‍ॅनालिक्टस आणि आयटी या विभागात केली जाणार आहे. ही पदभरती प्रामुख्याने कंपनीचे कोझिकोड येथील मुख्यालय, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता या विभागीय कार्यालयाव्यतरिक्त अन्य ठिकाणी केली जाणार आहे.

 

मलाबार गोल्डचे अध्यक्ष म्हणाले…

मलाबार गोल्डचे अध्यक्ष एम.पी. अहमद (Malabar Gold President M.P. Ahmed) यांनी सांगितले की, शोरुमची संख्या आणि उलाढाल या दोन्हीबाबत मलाबार गोल्ड हा जगातील आघाडीचा ज्वेलरी रिटेल ब्रॅण्ड (Jewellery Retail Brand) म्हणून ओळखला जावा हा या मागील दृष्टीकोन आहे. एक जबाबदार व्यावसायिक म्हणून आम्हाला समाजिक कर्तव्याची जाणीव आहे. याच दृष्टीकोनातून 5 हजार पदांची भरती मोहिम आम्ही सुरु केल्याचे अहमद यांनी सांगितले.

कोठे करायचा अर्ज
या पदांसाठी इच्छूक उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरुन अर्ज करायचा आहे. मलाबार गोल्ड केरळ व्यतिरिक्त तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये विस्तारण्यासाठी अधिक भर देत आहे. मलाबार गोल्डने यापूर्वीच चेन्नई, लखनौ, हैदराबाद, मुंबई, पुणे आणि बंगळुरू या मोठ्या शहरांमध्ये तसेच ईलुरु, सोलापूर आणि अहमदनगर या लहान शहरांमध्ये केंद्रीय स्पर्धात्मक दराने रिटेल मार्केटमध्ये (Retail Market) आपले स्थान निर्माण केले आहे.

या देशात विस्तार करण्याची योजना
आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार करत कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि अन्य आफ्रिकन देशांमध्ये विस्तार करण्याची मलाबार गोल्डची योजना आहे. सध्या या कंपनीचे 10 देशांमध्ये 260 रिटेल आऊटलेटस असून 14 होलसेल विभाग, डिझाईन सेंटर्स आणि फॅक्टरीज या देशभरासह मध्य-पूर्व, फार ईस्ट आणि युएसएमध्ये विस्तारल्या आहेत. 4.51 अब्ज डॉलरच्या वार्षिक उलाढालीसह कंपनी जागतिक ज्वेलरी रिटलर्समधील सर्वात मोठी कंपनी म्हणून प्रथम क्रमांकावर आहे.

Web Titel :- job alert for freshers and women malabar golds and diamonds kerala company recruitinng 5000

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल

Sanjay Raut | नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर

प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष