JOB | दिल्लीच्या AIIMS मध्ये नोकरीची संधी, मिळणार एक लाख पगार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – JOB | प्रत्येक जण सरकारी नोकरीची वाट पाहता असतो. आता दिल्लीमधील एम्स (AIIMS ) मध्ये नोकरी ( JOB) ची संधी उपलब्ध झाली आहे. इंजिनीअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (Engineering Consultant India Limited) ने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS ), नवी दिल्लीच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट यूनिट (Project Management Unit) मध्ये कन्सल्टंट आणि सिनियर कन्सल्टंट पदांच्या भरतीसाठी २ जुलै २०२१ ला जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही पदांसाठी पाच जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

सुरुवातीला या पदाची वर्षाची मुदत असणार आहे. त्यानंतर संस्थेची आवश्यकता आणि उमेदवाराचे काम पाहून हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. बेसिल्स एम्स भरती २०२१ (Basil AIIMS Recruitment 2021 ) च्या जाहिरातीनुसार नोकरीसाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट becil.com वर जाऊन अर्ज करु शकतात. ही प्रक्रिया २ जुलैला सुरू झाली असून अंतिम तारीख १५ जुलैला आहे. या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेवादवारांना ७५० अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. जर उमेदवाराला एकाहून अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास दुसऱ्या पदासाठी ५०० रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (हॉस्पिटल मॅनेजमेंट), सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट मॅनेजमेंट), सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोक्योरमेंट), सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (प्रोजेक्ट फायनांशिअल मॅनेजमेंट), सिनियर कन्सल्टंट/कन्सल्टंट (आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेंट) या पदांसाठी ही भरती होणार असून कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास ५० हजार रुपये प्रतिमहा तर सिनियर कन्सल्टंट पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारास १ लाख रुपये प्रतिमहा वेतन मिळणार आहे.

Web Title :  job ncr becil aiims recruitment 2021 consultant and senior consultant posts apply online

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Modi Cabinet Expansion | नारायण राणे, प्रीतम मुंडे, शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल

Movies Live Blog | दिलीपकुमार यांनी महात्मा गांधींच्या अनुयायांसोबत घालवली होती येरवडा कारागृहात रात्र; पुण्याशी होते त्यांचे ऋणानुबंद

Modi Cabinet Expansion | मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापुर्वीच मोठी खळबळ ! केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांचा राजीनामा