
Joshi Sports Premier League T-20 Tournament | दुसर्या ‘जोशी स्पोर्ट्स प्रिमिअर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे ३० सप्टेंबर पासून आयोजन !!
पुणे : Joshi Sports Premier League T-20 Tournament | व्हिजन स्पोर्टस् सेंटर तर्फे ‘जोशी स्पोर्ट्स प्रिमिअर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व (खुल्या गटातील) वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा ३० सप्टेंबर ते १९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी मैदान, सनसिटी रोड येथे होणार आहे. (Joshi Sports Premier League T-20 Tournament)
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक आणि संयोजक गणेश जोशी यांनी सांगितले की, जागतिक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे पडघम वाजायला लागले असून ५ ऑक्टोबर पासून ही रोमहर्षक स्पर्धा भारतामध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे सगळेच वातावरण हे क्रिकेटमय होणार आहे. यामुळे केवळ क्रिकेट पाहून आनंद घेण्यासोबतच क्रिकेट खेळून वर्ल्ड कप साजरा करूयात, असा आमचा मानस आहे. युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या टी-२० स्पर्धेत लिजंड्स क्रिकेट क्लब, स्पार्टन्स् क्रिकेट क्लब,
रायझिंग चॅम्पियन्स् क्रिकेट क्लब, ग्लोबल वॉरीयर्स क्लब, पुणेरी स्ट्रायकर्स इलेव्हन, गट्स अँड ग्लोरी क्लब,
सॅफरॉन क्रिकेट क्लब, फ्रिलार्न्सस् क्रिकेट क्लब, फायटर्स इलेव्हन, विलोव्हर्स क्रिकेट क्लब, गेम स्विंगर्स क्लब आणि अॅव्हेंजर्स क्रिकेट क्लब संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. (Joshi Sports Premier League T-20 Tournament)
गणेश जोशी पुढे म्हणाले की, स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाला आकर्षक बक्षिस व करंडक मिळणार आहे.
या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षक
याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना प्रत्येकी करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, ३० सप्टेंबर रोजी होणार असून स्पर्धेचा सलामीचा सामना लिजंड्स क्रिकेट क्लब
आणि रायझिंग चॅम्पियन्स् क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये रंगणार आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा