
MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंची ‘त्या’ मुद्यावरुन व्यापाऱ्यांना इशारा, म्हणाले-‘ नसत्या भानगडीत पडू नका, मनसैनिकांचे लक्ष असेल हे विसरु नका’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | दुकानावर मराठी पाट्या लावण्याच्या सक्ती विरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने व्यापाऱ्यांना फटकारत दुकानवर दोन महिन्यात मराठी भाषेत पाट्या लावा, असा आदेश दिला आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळीत दुकानावरील मराठी पाट्या सक्तीच्या करण्याचा निर्णय घेतला होता. याला व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु कोर्टाने मवीआ सरकारचा निर्णय कायम ठेवत काही अटींनुसार, प्रत्येक लहान, मोठ्या दुकानावर मराठी पाट्या असणे गरजेचे असल्याचे कोर्टाने म्हटले. कोर्टाचा निर्णय येताच मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (MNS Chief Raj Thackeray) आपले मत मांडताना व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. राज ठाकरे यांनी एक सविस्तर पोस्ट करुन आक्षेप घेणाऱ्या व्यापाऱ्यांना तंबी दिली आहे.
राज ठाकरेंची पोस्ट
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी एक्स (ट्विट) वर सविस्तर पोस्ट केली आहे. ते म्हणाले, सस्नेह जय महाराष्ट्र, पुढील 2 महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.
मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकाने, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणे किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे.
असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही
मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील
पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन (Municipal Administration) आणि काही
प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा
आदर करावा. आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल
हे विसरू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच ‘मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र
सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसेच पुढे देखील राहिले पाहिजेत,
असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | हडपसर : स्पिकरचा आवाज कमी करायला सांगितल्याने मारहाण करुन माजविली दहशत