मुंबई एअरपोर्टवर हरवली जुही चावलाची Diamond Ring ! पोस्ट शेअर करत मागितली लोकांची मदत

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जुही चावला (Juhi Chawla) हिनं नुकतीच ट्विट करत माहिती दिली आहे की, तिची एक डायमंड रिंग मुंबई एअरपोर्ट (Mumbai Airport) वर हरवली आहे. यासाठी तिनं लोकांकडे मदतही मागितली आहे. तिनं सांगितलं आहे की, गेल्या 15 वर्षांपासून ती डायमंड रींग घालत आली आहे. जुहीनं सांगितलं की, जर कुणी तिची मदत करत असेल त्याला बक्षिस देणं हे तिचं कर्तव्य असेल असंही तिनं सांगितलं आहे.

व्हायरल झाली पोस्ट

जुहीनं ट्विट करत लोकांना आग्रह केला आहे की, जर कुणालाही ही रींग सापडली तर त्यांनी पोलिसांनी सूचित करावं. त्या व्यक्तीला ती बक्षिसही देणार आहे. तिनं ज्वेलरीचा मॅचिंग पीसचा फोटोही शेअर केला आहे. जुहीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

जुहीची पोस्ट समोर येताच अनेकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी कमेंट करत आपल्या भावना मांडल्या आहेत. काहींनी रिंग हरवल्याबद्दल वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी तिला आधारही दिला आहे. काही चाहत्यांनी तिची ही पोस्ट शेअरही केली आहे.