Justice Bhushan Gavai | नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Justice Bhushan Gavai | उच्च न्यायालयातील (High Court) प्रत्येक न्यायव्यवस्थेतील घटकांनी सर्वसामान्य नागरिकाला कमी वेळात न्याय तसेच हक्क मिळवून देण्यासाठी माध्यम म्हणून कार्य करावे असे प्रतिपादन न्यायाधीश भूषण गवई (Justice Bhushan Gavai) यांनी केले.

औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या (Aurangabad High Court) आवारात वकील चेंबरचे फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन न्यायाधीश श्री. गवई यांनी केले. सामान्य नागरिकांसाठी कमी वेळेमध्ये न्याय देण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलाने पक्षकारासाठी न्यायव्यवस्थेचे महत्वाचे माध्यम म्हणून काम करावे. समाजातल्या शेवटच्या आणि गरीबातल्या गरीब व्यक्तीला कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्व न्याययंत्रणेने काम करावे ,तसेच ‘राईट टू जस्टिस’ हा मौलिक अधिकार त्यांना प्राप्त करून देण्याचे मोलाचे कार्य या माध्यमातून करण्यात यावे. दिवसेंदिवस न्यायालयाच्या प्रकरणात वाढ होत असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जलद आणि कमी खर्चात सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे असेही ते म्हणाले. (Justice Bhushan Gavai)

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक, .न्यायाधीश दिपांकर दत्ता , मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्ना वराळे, मुबंई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे, औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या वकील संघाचे अध्यक्ष नितीन चौधरी आणि सचिव सुहास उरगुंडे यांची उपस्थिती होती.

न्यायाधीश दिपांकर दत्ता म्हणाले की, काळानुसार न्यायव्यवस्थेमध्ये न्याय देण्याच्या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून

सर्वसामान्य नागरिकांना वेळेत न्याय मिळवून द्यावा . कोविड कालावधीमध्ये ज्या काही अडचणींना सर्वजण सामोरे गेलो, त्या परिस्थितीतून बोध घेत न्यायदानाचे कार्य वेगाने करावे. ई फायलिंगच्या वापराने न्यायालयाच्या न्यायदानात पारदर्शक आणि वेगाने प्रकरणाचा निपटारा करण्यात येईल,भविष्यात अद्ययावत कार्यप्रणालीचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अध्यक्ष नितीन चौधरी यांनी त्यांचे प्रास्ताविक मध्ये या चेंबर इमारतीसाठी दिलेला वकिलांचा लढा आणि योगदान तसेच स्वतंत्र इमारतीची गरज यावर भाष्य केले तसेच उच्च न्यायालय परिसरात अशी वकीलांसाठी स्वतंत्र वास्तू हे दुर्मिळ असून धारकांसाठी ते अभिमानास्पदअसल्याचे प्रतिपादन केले.

सूत्रसंचालन प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी केले तर आभार साची सुहास उरगुंडे यांनी मानले.
यावेळी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या वकील संघाचे सर्व सदस्य ज्येष्ठ वकील तसेच
महाराष्ट्र वकील परिषदेचे सदस्य आणि बार कौन्सिल ऑफ इंडिया चे जयंत जायभावे हेही उपस्थित होते वकील संघ कार्यकारिणी यामध्ये निमा सूर्यवंशी आणि अभय सिंह भोसले उपाध्यक्षा, ॲड. बाळासाहेब मगर ग्रंथालय चेअरमन ,
दयानंद भालके खजिनदार, शुभांगी मोरे आणी चैतन्य देशपांडे सहसचिव,
प्रदीप तांबडे सचिव ग्रंथालय, सदस्य अँड नयना पाटील, संकेत शिंदे, कृष्णा रोडगे,
राहुल पाटील, प्रियंका शिंदे, देवदत्त देशमुख, राकेश ब्राम्हणकर, वैभव देशमुख,
रवी खांडेभराड यांच्यासह उच्च न्यायालयातील सर्व वकील मंडळी उपस्थित होते.

Web Title :- Justice Bhushan Gavai | Every component of the court
should act as a medium to bring justice to citizens – Judge Bhushan Gavai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Agriculture Minister Abdul Sattar | हिंगोली : शेतकऱ्यांना समृध्द
करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन राबविणार – अब्दुल सत्तार

Mpower Art Express In Pune | सुदृढ व मुक्त संवादासाठी कलात्मक उपक्रम
उपयुक्त – डॉ. नीरजा बिर्ला