जगभर वाढतेय कोरोना व्हायरसची ‘दहशत’, ‘काजोल’ नं शेअर केलं DDLJ मधील सीनचं ‘मीम्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोना व्हायरसची दहशत वाढताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दुसरीकडे कोरोनावर मीम्स आणि जोक्सही व्हायरल होताना दिसत आहेत. सेलिब्रिटीही याबाबतीत काही मागे नाहीत. अभिनेत्री काजोलनं इंस्टावरून एक मीम्स शेअर केलं आहे. सध्या काजोलचं हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मीम्समध्ये जो फोटो आहे तो काजोल आणि शाहरुख खान यांच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ) या सिनेमातील आहे. शाहरुख खान रेल्वेच्या दारात उभा आणि काजोल त्याच्या दिशेने पळताना दिसत आहे.

फोटोत दिसत आहे की, काजोलच्या हातात सॅनिटायजर आहे. काजोलनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, सिमरनलादेखील सॅनिटायजरचं महत्त्व माहिती आहे. काजोलचं मीम्स सध्या सोशलवर व्हायरल होत असून चाहत्यांना खूप आवडलं आहे. काजोलनं हसत खेळत कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

याव्यतिरीक्त वेस्टर्न रेल्वेनंही डीडीएलजेच्या एका पोस्टरच्या मदतीनं जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न केला होता. वेस्टर्न रेल्वेनं एक ट्विट केलं होतं. यात एक पोस्टर दिसत होतं. फोटोत शाहरुख खान आणि राणी मुखर्जी दिसत आहे. कुछ कुछ होता है सिनेमातील तुम पास आए या गाण्याचे लिरीक्स बदलण्यात आले आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी सुरक्षित राहण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी आव्हान केलं आहे.