Kalki 2898 AD First Glimpse | रोमांचकारी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे खरे नाव आले समोर; टीझरने लावली सोशल मीडियावर आग

पोलीसनामा ऑनलाइन – Kalki 2898 AD First Glimpse | बहुचर्चित प्रोजेक्ट के (Project K) चित्रपटाचे गुढ आता उघड झाले आहे. चित्रपटच्या निर्मात्यांनी पहिली झलक, टीझर व चित्रपटाचे खरे नाव अखेर समोर आणले आहे. अभिनेता प्रभास (Actors Prabhas), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व कमल हासन (Kamal Haasan) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटची अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. अगदी चित्रपट (Kalki 2898 AD First Glimpse) नक्की कशावर आधारित आहे हे देखील सांगण्यात आले नव्हते. अखेर ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या टीमने अमेरिकेत प्रिमियरच्या (Project K USA Premier) माध्यमातून पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे.

अभिनेता प्रभास व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे लूक (Project K First Look) दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रिव्हिल करण्यात आले. हे लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले असून सर्वत्र त्यांचीच चर्चा होती. आता ‘प्रोजेक्ट के चित्रपटाचे खरे नाव (Project K Real Name) समोर आले आहे. ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचे खरे नाव ‘कल्की 2898 AD’ (Kalki 2898 AD) असे जाहीर करण्यात आले आहे कल्की म्हणजे भविष्यात अराजकता, अन्याय व अत्याचार याची सीमा गाठेल तेव्हा भगवान विष्णू हे कल्की (Kalki) स्वरुपात अवतार घेतील असे मानले जाते. या चित्रपटाची कथा देखील काहीशी अशाच पद्धतीची असून भविष्यात अन्याय विरुद्ध न्याय, अधर्म विरुद्ध धर्म असे जे युद्ध होईल ते यामध्ये मांडण्यात आले असल्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या नावावरुन 2898 सालाची ही गोष्ट असेल असे दिसत आहे. चित्रपटाचा टीझर (Project K Teaser) देखील रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये प्रभास, दीपिका, अमिताभ बच्चन व कमल हासन हे देखील दिसून येत आहेत.


https://www.instagram.com/p/Cu5hXKwy2Mi/?igshid=MzRlODBiNWFlZA==

‘प्रोजेक्ट के’ अर्थात कल्की 2898 AD या चित्रपटाचा टीझर (Kalki 2898 AD Movie Teaser) देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. रोमांचकारी असणाऱ्या या टीझरमध्ये युद्धकालीन परिस्थिती व लोकांवरील अन्याय दाखवण्यात आला आहे. यामध्ये प्रभास व दीपिका (Prabhas And Deepika) हटके अंदाजमध्ये दिसून येत आहे. तसेच कमल हासन व अमिताभ बच्चन यांच्या भूमिका देखील दमदार असल्याचे दिसून येत आहे. ‘कल्की 2898 AD’ या चित्रपटाचा टीझर आपल्याला जबरदस्त भविष्यात नक्कीच घेऊन जातो. टीझरमधील सीन चित्रपटाबाबत अधिक उत्सुकता निर्माण करत असून चित्रपटाची भव्यता नक्कीच प्रदर्शित करत आहे.

‘कल्की 2898 AD’ या चित्रपटाचा प्रिमियर शो काल (दि.20) रोजी अमेरिकेमध्ये दिमाखात पार पडला.
यावेळी संपूर्ण टीम उपस्थित होती. अमेरिकेतही हा चित्रपटाची जादू दिसून आली.
आज (दि.21) ‘कल्की 2898 AD’ खास प्रिमियर शो भारतामध्ये होणार आहे.
या चित्रपटाच्या टीझरने तर प्रेक्षकांना आधीच आश्चर्यचकित केले आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘कल्की 2898 AD’ चित्रपट (Kalki) ट्रेंडिंग वर आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन (Nag Ashwin) यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती साधारण 600 करोड
रुपयांमध्ये करण्यात आली आहे. आता पर्यंतचा हा बॉलीवूडमधील सर्वात महागडा व भव्य दिव्य चित्रपट ठरणार आहे.
हा चित्रपट पुढच्या वर्षी 2024 साली हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्लाळम, कन्नड व इंग्रजी भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला
जाणार आहे.

Health Crisis In Pune: Alarming Conjunctivitis Outbreak Hits Alandi, 1560 Cases Reported in 4 Days

Maharashtra Monsoon Session | ‘…म्हणून विरोधी पक्षनेता निवडीला विलंब’, भाजपचा काँग्रेसवर निशाणा (व्हिडिओ)