गुजरातच्या राज्यपालपदी आचार्य देवव्रत, कलराज मिश्रा यांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्‍ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी हिमाचल प्रदेशच्याबाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या जागेवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. तर आचार्य देवव्रत यांची हिमाचल प्रदेशमधून गुजरातच्या राज्यपाल पदावर नियुक्ती केली आहे.

हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदावर नियुक्त केलेले कलराज मिश्रा हे एक राजकारणी व्यक्तीमत्त्व आहे. ते मागील लोकसभेचे सदस्य होते. तसंच ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. ते उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. तर ते अनेकदा उत्तर प्रदेशमधून विधानसभेनवर निवडून आले आहे. तसंच २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी देवरिया मतदार संघातून २.६५ लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता.

नव्याने गुजरातच्या राज्यपाल पदी नियुक्ती झालेले आचार्य देवव्रत यांनी हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाचा कार्यभार अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला. हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल होण्याआधी ते हरियाणातील कुरुक्षेत्रातील गुरुकुलचे प्राचार्य होते.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन्ही राज्यपालांची नियुक्ती केली आहे. त्यासंबंधी राष्ट्रपतींनी अध्यादेश जारी केला असून, दोघेही आपापली जबाबदारी पूर्णपणे मार्गी लावतील, याबाबत त्यांना खात्री आहे.

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा