मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कंगणा राणावत हिचे ट्विटर अकाउंट कंपनीकडून सस्पेंड करण्यात आले होते. पण त्यामागचे कारण स्पष्ट झाले नव्हते. मात्र, आता खुद्द ट्विटरनेच याचे कारण दिले आहे. ‘द्वेषयुक्त आचरण आणि अपमानकारक वर्तन’ धोरणाचे उल्लंघन केल्याने कंगना राणावत हिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्याचे म्हटले आहे.
कंगनाने हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी यांना जबाबदार ठरवले होते. तसेच त्यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांचाही उल्लेख केला होता. पश्चिम बंगाल निवडणुकीबाबत भाजप ममता बॅनर्जींचे धोरण, तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारासंदर्भात बरेच ट्विट कंगनाने केले होते. तसेच तिने राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. ट्विटरने एका निवेदनाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. त्यामध्ये म्हटले, की ‘आम्ही स्पष्ट केले, की ज्या व्यवहारामुंळे ऑफलाईन नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. अशा व्यवहारांवर आम्ही कठोर कारवाई करू. कोणीही कोणाचे टार्गेट बनवून अपमान करू नये. किंवा अपमान करण्यासाठी धमकावण्यासाठी याचा प्रयत्न करण्यासाठी इतरांना भडकावू नये, तसेच इतरांचा आवाजही दाबू नये, असे ट्विटरने म्हटले आहे.
दरम्यान, कंगना राणावत ही सोशल मीडियावर सतत काहीना काही वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असते. आता तिने निवडणुकांसंदर्भात ट्विट केले होते. त्यामुळे ट्विटरने पॉलिसीनुसार, कंगना राणावत हिचे ‘अॅट कंगना टीम’ सस्पेंड केल्याने आता ‘अकाउंट सस्पेंडेड’ असा मेसेज दिसत आहे.
…तर अकाउंट कायमचे बंद
‘ट्विटरच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केले तर विशेषतः द्वेषयुक्त वर्तन धोरण आणि अपमानास्पद धोरणाबद्दल संबंधित अकाउंट कायमचे बंद केले जाते. आम्ही ट्विटरचे नियम सर्वांसाठी निष्पक्षपणे लागू करतो,’ असे ट्विटरने एका निवेदनात म्हटले आहे.