करण जोहरच्या मुलांच्या ‘बर्थडे’ पार्टीमध्ये करीनाचा ‘बोलबाला’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध चित्रपट निर्माते करण जोहर यांच्या घरात बुधवारी बर्थडे सेलिब्रेशन झाले. करण जोहर यांची जुळी मुले यश आणि रुहीचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी बॉलिवूड स्टार किड्स त्यांच्या घरी पोहोचले होते. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

यश आणि रुहीचा वाढदिवसाला अभिनेत्री करीना कपूर व मुलगा तैमूर, सोहा अली खान, तिची मुलगी इनाया नाओमी खेमू, एकता कपूर, तिचा मुलगा रवी, आलिया भट्ट, अमृता सिंग आणि त्यांची मुले फराह खान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत अनेक लोक आले होते.

या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये आपण करीना कपूर फराह खान आणि सोहा अली खानसोबत पोज देताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या पार्टीमध्ये आलिया भट्ट यश आणि रुहीसोबत खेळताना दिसत आहे. आलिया रुहीला गालावर किस करतानाचा देखील दिसत आहे. या फोटोत दोघेही खूप गोंडस दिसत आहेत.

या व्यतिरिक्त यश आणि रुही दोघेही खेळताना दिसत आहे. ही दोन मुलं एकमेकांसोबत खूप एन्जॉय करत आहेत. या पार्टीपूर्वी तैमूर अली खानसोबत यश आणि रुहीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तैमूर आणि त्याची बहीण इनाया देखील खेळताना दिसत आहे.

एकता कपूर देखील आपला मुलगा रवीसोबत पार्टीत पोहोचली होती. तिच्यासोबत भाऊ तुषार कपूर देखील होता. प्रत्येकाने करणसोबत फोटो काढले आहे. तसेच, एकताने मुलगा रवीचा व्हिडिओ पार्टीमधून शेअर केला आहे, ज्यामध्ये आपण रितेश देशमुख त्याच्याबरोबर खेळताना पाहू शकता.

करण जोहरची मुले रुही आणि यश 7 फेब्रुवारी 2017 रोजी सरोगसीच्या मदतीने जन्माला आले. ही दोन्ही मुले बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते आहेत आणि स्टार किड्सचे मित्र आहेत.