मराठी मालिकेतील अभिनेत्रीला समाजकंटकांकडून मारहाण (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   झी मराठी वाहिनीवरील कारभारी लयभारी या मालिकेतील अभिनेत्रीला अज्ञातांनी भर रस्त्यात मारहाण केली आहे. ट्रान्सजेंडर असलेल्या गंगाला (प्रणित हाटे) या भयानक अनुभवाचा सामना करावा लागला आहे. गंगाने स्वत: तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तिला कोणी आणि का मारहाण केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

या व्हिडीओमध्ये, मी एका बस थांब्यावर बसची वाट पाहत उभी होती. अचानक काही मुलांनी मला विनाकारण मारण्यास सुरुवात केली. मी काय करू आणि कोणाची मदत घेऊ, ते मला प्लीज सांगा, असे रडत गंगा सांगताना दिसत आहे. घडलेल्या घटनेमुळे गंगाने तिथून पळ काढला अन् ऑटोमधून ती घराकडे निघाली. ऑटोत बसल्यानंतर तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. आता पुढे काय कराव याची विचारणा ती नेटक-याकडे करत आहे. प्रणित हाटे म्हणजेच गंगाचा चेहरा डान्सिंग क्वीन’ या शोमधून महाराष्ट्रासमोर आला. झी युवाच्या मंचावर गंगाला सर्वप्रथम ओळख मिळाली आणि त्यानंतर कारभारी लयभारी मालिकेत ती कलाकार म्हणून वेगळ्या भूमिकेत लोकांसमोर आली आहे.