‘बेबो’ करीनाला इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण झाली, सांगितल्या इंडस्ट्रीत टिकून राहण्याच्या ‘टिप्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार करीना कपूरला इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिनं आपला प्रवास आणि आपल्या अनुभवांबद्दल एका मुलाखतीत सांगितलं आहे. तिलाही विश्वास होत नाही की, तिला इंडस्ट्रीत 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. तिनं इंडस्ट्रीत टिकून राहण्याच्या टिप्सही सांगितल्या आहेत.

करीना कपूर म्हणाली, “2000 साली आलेल्या रिफ्युजी सिनेमात पहिल्यांद कॅमेरा फेस करून मला 2 दशकं झाली आहेत. 20 वर्षे खूपच लवकर गेली. करिअरचा ग्राफ तर लाजवाब आहे. तो पाहून कोणलाही जलसी वाटू शकते.” करीनानं अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. अनेक अवॉर्ड्सही तिनं आपल्या नावावर केले. करीना बॉलिवूडमधील सर्वात जास्त डिमांडमध्ये राहणारी अ‍ॅक्ट्रेस ठरली.

इंडस्ट्रीत कशी टिकून राहिली ?

लग्नानंतरही जिथे चाहत्यांना अ‍ॅक्ट्रेसचा विसर पडतो अशा इंडस्ट्रीत तू मजबूतीनं कशी उभी राहिलीस असं विचारलं असताना करीना म्हणाली, “इंडस्ट्रीतील डायनेमिक्स मला चांगलेच ठाऊक आहेत. मी स्वत:ला कायमच रिइनवेंट करत राहिले आहे. ज्यांना योग्य निर्णय घेता येत नाही त्यांना हा प्रेशर सहन होत नाही. लोक नेहमीच तुमच्या ईगोला बूस्ट करत असतात. इंस्टावर 40 मिलियन्स फॉलोवर्स होणं आणि चौफेर सुरू असणारं कौतुक आपल्या आजूबाजूला एक नकली धुकं तयार करू शकतात. परंतु मी गेल्या दोन दशकांत या गोष्टी बाजूला ठेवून जगले आहे. ही एक कला आहे ज्यात मी गेल्या काही वर्षांत प्रभुत्व मिळवले आहे. मी असे सिनेमे निवडले जे महिलांची वेगळी बाजू मांडत होते.”

https://www.instagram.com/p/B773jWspXkt/

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.

https://www.instagram.com/p/B9vcPpvhK_x/

https://www.instagram.com/p/B9vcMbbhBih/

https://www.instagram.com/p/B9fxCMoF-UJ/

https://www.instagram.com/p/B9fw604FRh7/

https://www.instagram.com/p/B9fw7yyFXZK/

https://www.instagram.com/p/B9YL2YvgP8e/

https://www.instagram.com/p/B9YLzHkgN6Q/

https://www.instagram.com/p/B9YL0LxAvhe/

https://www.instagram.com/p/B9YL1L8AVb7/