Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने ‘धमाका’ चित्रपटासाठी घेतले एवढे मानधन; म्हणाला “मी त्या लायकीचा…”

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या सर्वत्र अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘शेहजादा’ चित्रपटाची चर्चा आहे. कार्तिकने आजवर अनेक हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. तर आज कार्तिकला बॉलीवूडमधील सर्वात महागडा कलाकार म्हणून देखील ओळखले जाते. कार्तिकने (Kartik Aaryan) नुकत्याच एका मुलाखतीत तो यासाठी का पात्र आहे यावर भाष्य केले आहे.

कार्तिकचा पहिला चित्रपट ‘प्यार का पंचनामा’ यासाठी त्याला 1.25 लाख रुपये मिळाले होते. त्यानंतर कोरोना महामारी दरम्यान त्याने एका चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन देखील आकारले होते. याबाबत कार्तिकला विचारले असता तो म्हणाला, “ही कोरोना काळातील गोष्ट आहे तर तेव्हा या गोष्टीवर चर्चा करावी का हे मला कळत नाही. पण हो त्याकाळी मी ‘धमाका’ नावाचा चित्रपट ज्याचे चित्रीकरण केवळ 10 दिवसांचे होते यासाठी मी 20 कोटी मानधन घेतले होते. निर्मात्यांचे पैसे मी 20 दिवसात दुप्पट करून दाखवतो. त्यामुळे मी इतकी फी आकारण्याच्या लायकीचा समजतो”.

कार्तिकचा (Kartik Aaryan) बहुचर्चित चित्रपट शेहजादा येत्या 10 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटातील कार्तिकचे ॲक्शन पॅकेज पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटात कार्तिक सोबत क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title :-Kartik Aaryan | bollywood actor kartik aryan charged 20 crores for 10 days shooting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘त्या’ पत्राची होतेय चांगलीच चर्चा

Mahrashtra Politics | शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा

Satyajeet Tambe | ‘माझ्यावरील घराणेशाहीचा आरोप चुकीचा’ सत्यजीत तांबेंचे टीकाकारांना जोरदार प्रतिउत्तर