Kartik Aaryan | कार्तिक आर्यन झाला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट; नवीन लूकची सर्वत्र चर्चा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्य़न (Kartik Aaryan) सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट (Satyaprem Ki Katha Movie) प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद दिला आणि चित्रपट हिट ठरला. यामध्ये कार्तिक आर्यनसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) झळकली होती. अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) मोठा चाहता वर्ग असून त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी कार्तिच्या नव्या स्टाईलमुळे (Kartik Aaryan style) तो चर्चेचे कारण बनला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमी हटके स्टाईल करताना दिसून येतो. तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला यावेळी त्याने निळ्या रंगाचा फॉर्मल शर्ट व ब्लॅक जीन्स परिधान केली होती. तसेच त्याने व्हाईट कलरचे शुज व काळ्या रंगाचे वॉच देखील स्टाईल केले होते. कार्तिकने केसांची स्पाईक केली होती. कार्तिकला ही स्पाईक हेअर स्टाईल अतिशय चांगली दिसत असून अनेकांनी त्याला कमेंट करुन तसे सांगितले आहे. कार्तिक आर्यन हा गॉगल परिधान करुन अतिशय स्टाईलिश दिसून येत होता. अनेक चाहत्यांनी यावेळी त्याच्या सोबत फोटो व सेल्फी काढले. अभिनेता कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहत्यांना त्याचा लूक आवडला आहे. अनेकांनी त्याला रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.

अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याने प्यार का पंचनामा (Pyaar Ka Punchnama), पती पत्नी और वो (Pati Patni Aur Woh), लव आज कल (Love Aaj Kal), सोनू की टीटू की स्वीटी (Sonu Ke Titu Ki Sweety), भूल भूलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तो ‘चंदू चॅपियन’ (Chandu Champion) या जीवनपटामध्ये झळकणार (Kartik Aaryan Upcoming Movie) आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान (Kabir Khan) यांनी केले असून हा चित्रपट भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर (Muralikant Petkar) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सध्या कार्तिक याच चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तसेच कार्तिक आर्यन हा ‘आशिकी 3’ (Aashiqui 3) या चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Athawale | आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम