Healthy Breakfast | वाढलेल्या वजनावर हल्ला करतील ‘हे’ 5 प्रकारचे हेल्दी ब्रेकफास्ट, पोटाची चरबी होईल गायब; सकाळी करा हे काम

नवी दिल्ली : Healthy Breakfast | डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, जगातील सुमारे २ अब्ज लोक लठ्ठ आहेत. भारतातही बेलगाम वजन असलेल्या लोकांची कमतरता नाही. विविध युक्त्या अवलंबून देखील अनेकांचे वजन कमी होत नाही. तज्ञांच्या मते, लोक वजन कमी करण्यासाठी अन्न सोडतात, परंतु असे करू नये. अन्नाचे प्रमाण कमी केले पाहिजे, अन्न सोडू नये. तज्ज्ञांच्या मते, सकाळी नाश्त्यामध्ये हेल्दी फूड घेतल्यास वजन नक्कीच कमी होईल. वजन झपाट्याने कमी करण्यासाठी नाश्त्यात कोणते पदार्थ खावेत ते जाणून घेऊया (Healthy Breakfast For Weight Loss)…

वजन कमी करणारा नाश्ता

१. स्मूदी –

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात फळे, ताक किंवा दुधाची स्मूदी बनवा आणि त्यात स्वतः बनवलेली प्रोटीन पावडर घाला. प्रोटीन पावडर बनवण्यासाठी बदाम, अक्रोड आणि ओट्स यांसारखे ड्राय फ्रूट्स मिक्स करून पावडर बनवा. या प्रकारची स्मूदी खाल्ल्याने दिवसभर भूक लागत नाही. एनर्जी लेव्हल वाढते. (Healthy Breakfast)

२. मूगडाळीचा चिला –

सकाळी उठल्यावर मूग डाळीपासून बनवलेला डोसा अथवा चिला सेवन करा. यातील प्रोटीन आणि फायबरमुळे वजन आटोक्यात येते. उर्जा मिळते. वारंवार भूक लागत नाही.

३. चिया सीड्स पुडिंग-

चिया सीड्स एक सुपरफूड असून यामध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, फायबर, प्रोटीन भरपूर असते.
चिया सीड्समध्ये बॅड फॅट नसते. ते वजनाला आळा घालते. अनेक रोगांपासून संरक्षण करते.

४. ताक आणि बेरी –

ताक प्रोबायोटिक्स असते जे पचनासाठी खूप उपयुक्त आहे. बेरी प्रोटीन आणि हेल्दी फॅटचा खजिना आहे.
दोन्हीची स्मूदी अनियंत्रित वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.

५. ओटमील –

ओटमील प्रोटीनचा खजिना आहे. प्रोटीन पावडरमध्ये देखील ओटमील असते.
बॅड फॅट आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करणे हा वजन कमी करण्याचा सोपा मार्ग आहे.
सकाळी लवकर ओटमीलसोबत काही ड्रायफ्रुट्स आणि दालचिनीचे सेवन केले तर वजन कमी होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parking Regulations Revamped at Kokane Chowk in Pimple Saudagar to Enhance Traffic Flow

Jailer Movie | सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर’ चित्रपटासाठी कंपन्यांनी जाहीर केली ऑफिशियल सुट्टी