8 फेब्रुवारीला खरंच आहे का ‘अद्भुत’ संयोग ? काशीच्या ज्योतिषांनी सांगितलं ‘वास्तव’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यावर्षी 8 फेब्रुवारीला 2588 वर्षानंतर असा संयोग आला आहे की या दिवशी केलेले तोडगे लोकांचे जीवन बदलेलं. माहितीनुसार 8 फेब्रुवारीला दिन सूर्याेदयापूर्वी घर साफ करणे, जुना झाडू फेकून देणे आणि लोकांना कमळाचे फूल वाटणे अशा काही तोडग्यांमुळे अनेक आजार दूर होतील.

हा संयोग काशीच्या ज्योतिषांनी नाकारला आहे. त्यांचे म्हणणे आहे की 8 फेब्रुवारीला कोणताही संयोग नाही आणि हे फक्त ज्योतिषी बदनाम करण्याचा प्रकार आहे. ज्योतिषांचे म्हणणे आहे की 8 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये निवडणूका होतील आणि या अफवामुळे राजकीय फायदा घेण्याचा प्रकार सुरु आहे.

astrology

ज्योतिष पवन त्रिपाठी म्हणाले की असा कोणताही संयोग नाही, ज्योतिष एक विज्ञान आहे आणि असा काही संयोग बनला तर ज्योतिष विज्ञान देखील हे स्विकार करतो. ग्रहांच्या गतिवर देखील योग असतात परंतु 8 फेब्रुवारीला असा कोणताही योग नाही. पवन त्रिपाठी म्हणाले की या संयोगात झाडू फेकणे आणि कमळाचे फूल डोक्यावरुन फिरवणे हे सर्व निरर्थक आहे.

ज्योतिषींचे म्हणणे आहे की या सर्व बाबीमुळे भ्रम निर्माण केला जात आहे आणि याचा ज्योतिष विज्ञानाशी कोणताही संबंध नाही. ज्योतिष शास्त्र याचे खंडन करते. यावर तयार केलेल्या कुंडलीचा विचार केला तर यात कोणताही योग दिसत नाही.

आणखी एक ज्योतिषी आणि काशी विद्वत परिषद संघटनेचे मंत्री आचार्य ऋषि द्विवेदी यांनी सांगितले की ज्योतिषला वेदाचे नेत्र म्हणले जाते. 8 फेब्रुवारीच्या या योगाची विचार केला तर असे योद 2-3 वर्षात देखील येतात आणि हा एक भ्रमक प्रचार आहे. असे मानले जात आहे की ज्योतिषच्या माध्यमातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऋषि द्विवेदी यांचे म्हणणे आहे की ज्योतिषीच्या आडून राजकीय स्वर्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

8 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहे. त्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.