Katraj Kondhwa Road | अखेर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये निधी दिला; रस्त्याच्या कामाला गती मिळणार

पुणे : Katraj Kondhwa Road | दक्षिण पुण्यातील महत्वाच्या समजल्या जाणार्‍या कात्रज- कोंढवा रस्तारुंदीच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने सुमारे १४० कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. अतंत्य वर्दळीच्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते. शासनाचा निधी उपलब्ध झाल्याने रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती मिळणार आहे.

महापालिकेच्यावतीने कात्रज- कोंढवा या बाह्यवळण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरवातीला ८४ मी. रुंद या रस्त्याच्या कामात भूसंपादनाचा मोठा अडथळा असल्याने प्रशासनाने रस्ता रुंदी ५० मी. पर्यंत कमी केली आहे. यानंतरही येथील काही जागा मालकांनी टीडीआर, एफएसआय ऐवजी रोखीने मोबदला मिळावा, अशी मागणी कायम ठेवल्याने राजस सोसायटी चौक ते खडीमशीन दरम्यानच्या अवघ्या पावणेचार कि.मी. रस्त्याचे काम गेली काही वर्षे रेंगाळले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झालेली मोठी लोकवस्ती आणि जड वाहतुकीच्या अत्यंत रहदारीच्या या मार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे मागील पाच वर्षात नागरीक मेटाकुटीला आले आहेत. या रस्त्याचे काम लवकर व्हावे यासाठी या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहे. यामुळे सातारा रस्त्यावरील आंबेगाव येथील वंडरसिटी ते राजस सोसायटी चौकादरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामाला केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध झाला आणि कामही सुरू झाले.

परंतू उर्वरीत रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी जैसे थेच राहीले. राज्य शासनाने भूसंपादनासाठी २०० कोटी रुपये निधी द्यावा,
अशी मागणी महापालिका प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत होती.
याला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत निधीची घोषणा देखिल केली.
परंतू घोषणेनंतर मागील सहा महिन्यांत प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाला नाही.
अखेर लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची आचार संहिता लागू होण्याच्या अगोदर काही तास राज्य शासनाने
भूसंपादनासाठी येणार्‍या खर्चाच्या निम्मी रक्कम अर्थात १३९ कोटी ८३ लाख रुपये महापालिकेला देण्याचा शासन
आदेश काढला आहे. भूसंपादनासासाठी २७९ कोटी ६६ लाख रुपये खर्च येणार असून उर्वरीत रक्कम महापालिका देणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Lok Sabha Election 2024 | पंकजा मुंडेंना बीडमध्ये तगडं आव्हान, शरद पवार देणार ज्योती मेटेंना उमेदवारी?