Beed Lok Sabha Election 2024 | पंकजा मुंडेंना बीडमध्ये तगडं आव्हान, शरद पवार देणार ज्योती मेटेंना उमेदवारी?

मुंबई : Beed Lok Sabha Election 2024 | भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेच्या वीस मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. येथून महायुतीचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न सर्वांना पडलेला असतानाच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar NCP) येथून दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेंना (Jyoti Vinayak Mete) उमेदवारी देणार असल्याचे वृत्त आहे.

शरद पवारांनी हा राजकीय डाव टाकल्यास पंकजा मुंडे यांच्या समोर तगडे आव्हान उभे राहणार आहे. बीड मतदारसंघात पंकजा यांचे विरोधक म्हणून धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जाते. परंतु, आता अजित पवार गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाल्याने आधीच पंकजा मुंडे यांची मोठी अडचण झाली आहे. त्यातच ज्योती मेटेंना उमेदवारी मिळाल्यास या अडचणी वाढणार आहेत.(Beed Lok Sabha Election 2024)

ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. मराठा आरक्षण मुद्दा पेटलेला असताना महाविकास आघाडीने ज्योती मेटे यांना उमेदवारी दिल्यास पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

डॉ. ज्योती मेटे या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
मेटे यांच्या निधनानंतर त्या सातत्याने कार्यकत्र्यांच्या संपर्कात आहेत.
आता, त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध बीडमधून लढलेले धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय येडेश्वरी
शुगर्सचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे.
ते देखील महाविकास आघाडीत जाण्यास इच्छूक आहेत. अशातच, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे
यांनी देखील भाजपाला आव्हान दिले असल्याने पंकजा मुंडे यांना निवडणूक सोपी असणार नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024- Maharashtra Cabinet Decisions |लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, 72 तासात तीन मंत्रिमंडळ बैठका अन् 62 निर्णय

Marged Villages In PMC | पुणे : समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 9 लोकप्रतिनिधींची सदस्यपदी नियुक्ती

Pune Dattanagar Double Murder Case | पुण्यात दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस, पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून

PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ