#VideoViral : कतरीनाने सलमानला केले लग्नासाठी प्रपोज 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा भारतच्या प्रमोशनमध्ये खूप बिजी असल्याचे दिसत आहे. हा सिनेमा त्याच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. तो नेहमीच सिनेमाबद्दल बोलताना दिसत असतो. सध्या सलमान आपल्या सिनेमासाठी खूपच मेहनत घेताना दिसत आहे. या सिनेमात सलमान सोबतच कतरीना कैफदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील अनेक नवीन गोष्टी समोर येताना दिसतात. या सिनेमाचे एक गाणेही नुकतेच रिलीज झाले आहे.

काही दिवसांपूर्वी भारत सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर प्रेक्षकांना विशेष आवडला होता. त्यानंतर सिनेमाचे गाणे एकामागोमाग एक समोर येताना दिसले. सिनेमाच्या गाण्यांनाही चाहत्यांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून आले. यानंतर आता सिनेमात एक क्लीप सध्या समोर येताना दिसत आहे. सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विटरवर या सिनेमातील एक क्लीप शेअर केली आहे. सध्या ही क्लीप व्हायरल होताना दिसत आहे. या क्लीपमध्ये कतरीना सलमानला लग्नासाठी प्रपोज करताना दिसत आहे.

अली अब्बास जफर यांनी ट्विटरवर ही क्लीप शेअर केल्यानंतर या क्लीपलाही चाहत्यांचं मोठं प्रेम मिळताना दिसत आहे. हा छोटासा व्हिडीओ चाहत्यांना भावताना दिसत आहे. दरम्यान भारत हा सिनेमा अॅन ओड टू माय फादर या सिनेमाचा रिमेक आहे.