Katrina Kaif | कतरीना आणि विकीच्या लग्नाची लवकरच सगळ्यांसमोर होणार घोषणा; ‘हे’ काम करून फॅन्सला करणार खुश

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Katrina Kaif | अलीकडे अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. एवढंच नाही तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोघेही राजस्थान (Rajasthan) मधल्या रॉयल डेस्टिनेशनमध्ये लग्न करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. एवढंच नाही तर त्यांच्या संगीत आणि लग्नात कोणते कलाकार शिरकत करणार याची देखील यादी समोर आली असली तरी कतरीनाने आणि कौशलने त्यांच्या लग्नाचे अधिकृत घोषणा (Official Announcement) आतापर्यंत केलेली नाही. यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

विकी कौशलच्या जवळच्या सुत्रधाराने विकी आणि कतरीना कैफ (Katrina Kaif) लवकरच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपुर्वीच विकी आणि कतरीनाच्या लग्नात अभिनेता सलमान खान (Salman Khan) येणार नसल्याचं समोर आलं आहे. तर त्यांच्या संगीतमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddhart Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advaani) चार चांद लावणार असल्याचं देखील समोर आलं आहे.

कतरीना कैफ आणि विकीने त्यांच्या टिळ्याचा कार्यक्रम पार पाडल्याची देखील बातमी समोर आली होती. तर याबाबत कतरीना आणि विकीने कतरीनाचा खास मित्र अभिनेता कबीर खानच्या (Kabir Khan) घरी त्यांच्या टिळ्याचा कार्यक्रम पार पाडल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title : Katrina Kaif | katrina kaif and vicky kaushal will soon announce their marriage officially know full details in marathi policenama news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील हॉटेल ‘पेंटहाऊस’ मधील त्रासाला कंटाळून वेटरची 13 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; हॉटेल प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ

N. Chandrababu Naidu | पत्नीच्या ‘अपमाना’मुळे रडले चंद्राबाबू नायडू; म्हणाले – ‘आता CM बनल्यानंतरच येईन विधानसभेत’ (व्हिडीओ)

Maharashtra Legislative Council Elections | महाराष्ट्र विधान परिषदेसाठी कोल्हापूर, ‘धुळे-नंदुरबार’, नागपूर, मुंबई आणि ‘अकोला-बुलढाणा-वाशीम’ येथून ‘या’ 5 दिग्गजांना भाजपकडून उमेदवारी; चित्रा वाघ यांना संधी नाही

Tirupati Balaji Flood | अवकाळी पावसाचा आंध्रात कहर ! तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले; महाराष्ट्रासह गोव्याला पावसाचा इशारा

Honey Trap | कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅपमध्ये; सव्वातीन कोटी उकळले, फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक