Coronavirus Lockdown : ‘या’ कैद्यांना हायकोर्टानं दिला तात्पुरता जामीन

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – केरळ हाय कोर्ट कोरोना व्हायरसमुळे कोठडीत असलेल्या कैद्यांना आणि रिमांडमध्ये घेतलेल्या आरोपींना अंतरिम जामीन देणार आहे. देशभरात वाढत्या कोरोना व्हायरसमुळे हा जामीन दिला गेला आहे. हा जामीन ३० एप्रिल पर्यंत दिला गेला आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात आता कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या १०७१ झाली आहे. तर एकीकडे यातून ९९ लोकं बरे झाले आहेत. आतापर्यंत २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांना पाहता पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. या लॉकडाऊनच्या एक दिवस अगोदर पीएम यांनी कर्फ्यूची घोषणा केली होती.

आज लॉकडाऊनचा सहावा दिवस असून देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून लोकांची छायाचित्रे समोर येत आहेत. भारत सरकरकडून सगळ्या लोकांना घरी राहण्याचा आदेश दिला गेला आहे. तसेच सगळ्या लोकांना खबरदारी घेण्याचाही आदेश दिला गेला आहे. रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमातही मोदींनी सगळ्या लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले होते. याशिवाय भारतात लॉकडाऊनमुळे गरीब लोकांना शक्य होईल ती आर्थिक मदत करण्याची घोषणा केली जात आहे.