‘खेसारी लाल-काजल राघवानी’चं ‘हे’ भोजपुरी गाणं सोशलवर घालतंय धुमाकूळ ! आतापर्यंत मिळवलेत 200 मिलियन Views (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि काजल राघवानी यांचं एक गाणं सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. पागल बनाइबे का असं या गाण्याचं नाव आहे. खेसारी लालचा हिट भोजपुरी सिनेमा दबंग सरकार मधील हे गाणं आहे. खेसारी आणि काजल यांनी यात जबरदस्त डान्स केला आहे. यात काजल खूपच हॉट दिसत आहे. सध्या हे गाणं सोशलवर खूप चर्चेत आहे.

खेसारी आणि काजल यांचं हे गाणं जुनच आहे परंतु खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत या गाण्याला 200 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. हे गाणं खेसारीच्या पॉप्युलर गाण्यांपैकी एक आहे. चाहत्यांनाही हे गाणं खूप आवडलं आहे. दोघांच्या डान्सनं तर धमाल केली आहे.

गाण्याबद्दल बोलायचं झालं तर पागल बनाइबे का हे गाणं 2018 मध्ये रिलीज झालं होतं. खेसारी लाल आणि भोजपुरी सिंगर प्रियंका सिंह यांनी हे गाणं गायलं होतं. धनंजय मिश्रानं या गाण्याला म्युझिक दिलं आहे. आजाद सिंहनं हे गाणं लिहिलं आहे.

दबंग सरकार या सिनेमात खेसारी लाल यादव प्रमुख भूमिकेत होता. या सिनेमाची खूप चर्चा झाली होती. यात खेसारीनं पोलिसाची भूमिका साकारली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like