Kiara Advani | कियारा व सिद्धार्थचा स्विमिंग करताना व्हिडिओ व्हायरल; कियाराची हटके बिकनी स्टाईल

पोलीसनामा ऑनलाइन – ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) ही लाईमलाईटमध्ये आहे. आज कियारा बॉलीवुडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. कियाराचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी हिने नुकताच तिचा 31 वा वाढदिवस (Kiara Advani Birthday) साजरा केला. कियारावर (Kiara Advani) सोशल मीडियाच्या माध्यमाधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कियाराने देखील तिचा स्पेशल डे तिच्या स्पेशल व्यक्तीसोबत स्पेंड केला. तिने तिचा पती अभिनेता सिद्धार्थ म्हलोत्रा (Sidharth Malhotra) सोबत बर्थ डे सेलिब्रेट केला. या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलीवुडचे प्रसिद्ध कपल अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ म्हलोत्रा (Kiara Advani And Sidharth Malhotra) हे एक लोकप्रिय कपल आहे. त्यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्नगाठ बांधली. अनेकदा हे लवली कपल एकत्र स्पॉट होत असतात. नुकतेच कियाराच्या वाढदिवसानिमित्त ते व्हेकेशनवर गेलेले दिसले. यावेळी कियाराने हटके बिकनी स्टाईल (Kiara Advani In Bikini) केली होती. तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा व सिद्धार्थचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कियारा व सिद्धार्थ एकत्र पाण्यामध्ये उडी मारुन स्विमिंग करताना दिसत आहे. सिद्धार्थ व कियारा यांचा हा स्पेशल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत तर काही नेटकऱ्यांनी तिला रेड हार्ट कमेंट केले आहेत.

अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. चित्रपटातील तिची व अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना आवडली. लवकरच तिचे अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अभिनेता सिद्धार्थ या आधी ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) चित्रपटामध्ये झळकला होता. लवकरच त्याचा ‘योद्धा’ चित्रपट (Yoddha Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थ व कियाराची (Siddharth And Kiara) जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे. अनेकांना त्यांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Priyanka Chopra | प्रियांकाचे पती व मुली सोबत खास व्हेकेशन: बिकनी फोटो होत आहेत व्हायरल