Priyanka Chopra | प्रियांकाचे पती व मुली सोबत खास व्हेकेशन: बिकनी फोटो होत आहेत व्हायरल

ADV

पोलीसनामा ऑनलाइन – Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमी जागतिक स्तरावर चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. प्रियांका तिचे लाईफ अपडेट नेहमी चाहत्यांसोबत शेअर करते. अभिनेत्री प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनस (Priyanka Chopra and Nick Jonas) हे बीचवर व्हेकेशन एन्जोय करत आहेत. हे लवली कपल त्यांची मुलगी मालती (Malti Marie Chopra Jonas) सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. त्यांनी त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये प्रियांका बिकनी (Priyanka Chopra In Bikini) घालून समुद्रकिनारी पती निक सोबत रोमांस करताना दिसत आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. मात्र यादरम्यान निक व प्रियांका यांनी एकत्र वेळ घालवला नव्हता. प्रियांका कामामध्येही कितीही व्यस्त असली तरी ती फॅमिलीला वेळ द्यायला विसरत नाही. आता ती पती निक जोनस व मुलगी मालती सोबत व्हेकेशनला गेली आहे. यावेळी तिने चेक्सची बिकनी परिधान केली आहे. या बिकनी स्टाईलमध्ये ती पती निक्सच्या मांडीवर बसली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच निक देखील मालतीसोबत खेळताना दिसत आहे. या फोटोमधून निकचे त्याची मुलगी मालती हिच्यावरचे प्रेम दिसून येत आहे. तसेच प्रियांका, मालती व निक यांचे समुद्रामध्ये खेळतानाचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांना या फॅमिलीचे फोटो फार आवडले आहेत.

अभिनेत्री प्रियांका व निक जोनस यांनी 2018 साली लग्न (Priyanka Chopra Marriage) केले. त्यानंतर ते नेहमी एकमेकांना वेळ देताना दिसून येतात. यावेळी देखील निकने प्रियांकाचा वाढदिवस नुकताच झाला असल्यामुळे तिला खास सरप्राईज दिले आहे. फोटोमध्ये हे लवली कपल स्टाईलिश कपड्यांमध्ये आकर्षक पोज देत आहेत. त्यानंतर हॉटेलमध्ये प्रियांकासाठी खास गिफ्ट ठेवलेले दिसत आहे. यावर ‘हॅप्पी बर्थ डे प्रि’ हे लिहिण्यात आले आहे. यावेळी प्रियांकाने केलेली खास स्टाईल देखील नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहेत. त्याचबरोबर मालतीला कडेवर घेऊन प्रियांका (Priyanka With Malti) नाईट वॉकला देखील गेलेली दिसत आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, निक जोनस व मालती यांचे (Priyanka Chopra and Nick Jonas) हे खास व्हेकेशन मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी त्यांना रेड हार्ट कमेंट केले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बॅकलेस ड्रेसने वाढवले सोशल मीडियाचे तापमान