Kiara Advani Oops Moment | कार्तिक आर्यनने कियाराला दिला ड्रेस सावरण्याचा इशारा; कियाराचा केला उप्स मुमेंटपासून बचाव, व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – Kiara Advani Oops Moment | सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलीवुडचा एक चित्रपट धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांची सुपरहिट जोडी असलेला ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला असून अनेक लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अनेक महिन्यांनंतर आणि बॉलीवुड चित्रपटांवर होणाऱ्या सततच्या टीकेनंतर चांगला चित्रपट (Kiara Advani Oops Moment) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे असे मत चित्रपट समीक्षकांनी मांडले आहे.

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Actor Karthik Aaryan) हे कलाकार तरुणांच्या पसंतीचे असून दोघांचा चाहता वर्गही फार मोठा आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कियारा आणि कार्तिकने (Kiara And Karthik) एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी कार्तिकने तिला ड्रेस सांभाळण्यासाठी सांगितले आणि तो कॅमेऱ्यापुढे उभा राहिला. कार्तिक आणि कियाराचा हा क्षण कॅमेरामध्ये कैद झाला. कार्तिकच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या मुलाखतीमध्ये कार्तिक आणि कियारा यांनी दिलखुलासपणे सहभाग नोंदवला. यावेळी कियाराने रेड रंगांचा शॉर्ट वन पीस घातला होता. हा ऑफ शोल्डर पद्धतीचा ड्रेस होता. लाल रंगाच्या या ड्रेसने कियाराचे सौंदर्य अधिक खुलले होते. मुलाखतीनंतर मीडियाला फोटोसाठी कियारा पोझ देणार होती. पण त्या आधी कार्तिक तिच्या पुढे उभा राहिला आणि त्याने तिला हळूच काहीतरी सांगितले. त्यानंतर लगेचच कियाराने आपला ड्रेस सावरला आणि ती फोटो साठी पोझ देऊ लागली. अशा प्रकारे कियाराचा सहकलाकार अभिनेता कार्तिक आर्यनने तिला उप्स मुमेंटपासून (Kiara Advani Oops Moment) वाचवले.

या पूर्वी कियारा आणि कार्तिकने भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiyaa 2) या सुपरहिट चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. त्यावेळीही प्रेक्षकांना ही ऑन स्क्रिन जोडी आवडली होती. आता पुन्हा एकदा हे दोघे ‘सत्यप्रेम की कथा’ या (Satyaprem Ki Katha) चित्रपटात एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस (Sameer Vidwans) यांनी केले असून पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Web Title : Kiara Advani Oops Moment | kartik aaryan saves kiara advani from oops moment at the promotion of satyaprem ki katha

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘गुगली टाकून मला नाही तर पुतण्याला बोल्ड केलं…’, शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार (व्हिडिओ)

Pune Police News | पुण्यात पोलीस अंमलदाराकडून सिनेस्टाईल पाठलाग ! ऊसाच्या शेतात पळून गेलेला गुन्हेगार ताब्यात; गावकऱ्यांकडून पोलिसांचा सत्कार

Bar Association Appeals for Enhanced Court Facilities in Pimpri-Chinchwad

Darshana Pawar Murder Case | दर्शना पवार खून प्रकरणात मोठं अपडेट, राहुल हंडोरेनं…