किरण बेदी : ‘टॉपकॉप’ला जमले नाही राजकारण, पहिल्यांदा CM च्या रेसमधून बाहेर, आता LG पदावरून हटवले

नवी दिल्ली : पुदुचेरीच्या एलजी म्हणजेच उपराज्यपाल पदावरून किरण बेदी जवळपास 100 दिवसानंतर रिटायर्ड होणार होत्या. किरण बेदी यांनी 29 मे 2016 ला पुदुचेरीच्या उपराज्यपाल पदाची शपथ घेतली होती, या हिशेबाने 29 मे 2021 ला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. परंतु, या दरम्यान एका मोठ्या घटनाक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना उपराज्यपाल पदावरून हटवले.

भारताचे संविधान सांगते की, उपराज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती पाच वर्षासाठी करत असले तरी उपराज्यपाल आपल्या पदावर तोपर्यंत राहू शकतात, जोपर्यंत त्यांना राष्ट्रपतींचा विश्वास मिळालेला असेल.

71 वर्षांच्या किरण बेदी यांच्या करियरमध्ये अनेक संधी आल्या, तर अनेकवेळा त्यांना महत्वाकांक्षेच्या रेसमधून बाहेर पडावे लागले. किरण बेदी यांच्या नावावर देशाच्या पहिल्या महिला अधिकारी होण्याचा गौरव आहे. आज पोलीसाच्या गणवेशात अनेक महिला अधिकारी दिसत असल्या तरी किरण बेदी यांनी हा युनिफॉर्म तेव्हा परिधान केला जेव्हा पोलीस दलात केवळ पुरूषांचा दबदबा होता.

एलजी पदावरून अशाप्रकारे निरोरापाची नव्हती आशा
2016 मध्ये किरण बेदी यांना वैयक्तिक आयुष्यात मोठा झटका बसला. 31 जानेवारी 2016 ला किरण बेदी यांचे पती बृज बेदी यांचे निधन झाले. यानंतर मे 2016 मध्ये त्यांची नियुक्ती केंद्र शासित प्रदेश पुदुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून करण्यात आली. दिल्लीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर किरण बेदी यांच्यासाठी ही नवी जबाबदारी आव्हानात्मक होती, सोबतच अशाप्रकारे दिल्ली निवडणुकीत संघर्षासाठी त्यांचा विक्रम सुद्धा नोंदला गेला.

दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रपती भवनातून झालेल्या या नियुक्तीने त्यांची राजकीय प्रतिमा पुन्हा एकदा वाढली. किरण बेदी अवघ्या साडेतीन महिन्यानंतर आपला एलजी पदाचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार होत्या. त्या पुदुचेरीच्या राजभवनातून एका सन्मानजनक फेयरवेलची तयारी करत होत्या, परंतु वेळेपुर्वीच त्यांच्यासाठी फर्मान जारी झाले.